शिक्षकदिनानिमित्त चित्रकला स्पर्धात १५० विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST2021-09-07T04:49:47+5:302021-09-07T04:49:47+5:30
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी नीलेश देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा चांडक, अजय व्यवहारे, डॉ. रिपल ...

शिक्षकदिनानिमित्त चित्रकला स्पर्धात १५० विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त सहभाग
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी नीलेश देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा चांडक, अजय व्यवहारे, डॉ. रिपल राणे, माजी मुख्याध्यापक मधुकर राऊत, विठ्ठल राऊत, इंदुबाई राऊत, प्राचार्य नीलिमा वडणारे, प्राचार्य नितीन वडणारे, रूपाली राऊत उपस्थित होते.
या स्पर्धेत गट ४ प्राची फाले प्रथम , गट ३ प्राची पराते प्रथम, गट २. आस्था जयस्वाल प्रथम, गट एकमध्ये रुद्र सरोदे याला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रकार हरी ताजनेकर कला व चित्रकला शिक्षक वीरेंद्र कडू प्रफुल्ल तायवाडे यांनी काम पाहिले. याप्रसंगी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अतिथीचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सचिन राऊत यांनी केले. संचालन दुर्गा लांजेवार, श्वेता, चैताली, श्रेया, वैशाली, तेजस, प्रतीक, अनुश्री, अनुष्का यांनी केले.