शालेय विद्यार्थ्यांचे स्वयंस्फूर्त स्वच्छता अभियान
By Admin | Updated: May 29, 2016 02:20 IST2016-05-29T02:20:33+5:302016-05-29T02:20:33+5:30
सध्या सर्व शाळांच्या सुट्या सुरू आहेत. समतानगर भागातील चिमुकल्यांनी उन्हाळ्याच्या सुट्यांचा सदुपयोग केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांचे स्वयंस्फूर्त स्वच्छता अभियान
परिसर केला स्वच्छ : उन्हाळ्याच्या सुट्यांचा केला सदुपयोग
वर्धा : सध्या सर्व शाळांच्या सुट्या सुरू आहेत. समतानगर भागातील चिमुकल्यांनी उन्हाळ्याच्या सुट्यांचा सदुपयोग केला आहे. या चिमुकल्यांनी बैठक घेत उन्हाळ्यातील योजनांवर चर्चा केली. यात विविध योजना पूढे आल्या; पण सर्वांचा आवडता विषय म्हणजे खेळ! खेळण्याकरिता उपलब्ध मैदानावर घाणीचे साम्राज होते. यामुळे ते मैदान स्वच्छ करण्यावर सर्वांचे एकमत झाले. यातून चिमुकल्यांनी स्वच्छता अभियान राबवित परिसर स्वच्छ केला.
सफाईकरिता आवश्यक साहित्य खरेदीकरिता प्रत्येक घरातून दहा रुपये प्रमाणे निधी गोळा करण्यात आला. आवश्यक साहित्य व खराटे विकत आणले आणि सर्व मुले कामाला लागली. पाहता-पाहता मैदान स्वच्छ झाले. यानंतर त्यांनी मैदानावर विविध सूचना फलक तयार करून लावले. आज मुले त्या मैदानावर खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
यात तनिष्क शेंडे, प्रियांशू सोनटक्के, अनघा वानखडे, मेधावी सोनटक्के, मोहित सोनटक्के, परी डांगे, आदेश बागेश्वर, श्रेया वाघमारे यांनी विशेष मेहनत घेतली. छोट्या मुलांचा हा उपक्रम थोरांचे कौतुक मिळवून गेला असून त्यांच्याकरिता पे्ररणादायी ठरला.(कार्यालय प्रतिनिधी)