शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वर्धेत बनावट सॉफ्टवेअर कंपनीचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:59 IST

येथील डॉल्फीन लॉजिक सिस्टिम येथे कार्यरत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीची कोणतीही परवानगी न घेता विकसीत केलेले तंत्रज्ञान दुसऱ्या कंपनीला दिले.

ठळक मुद्दे१.८९ लाख रुपयांचे साहित्य जप्त : सुधारीत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील डॉल्फीन लॉजिक सिस्टिम येथे कार्यरत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीची कोणतीही परवानगी न घेता विकसीत केलेले तंत्रज्ञान दुसऱ्या कंपनीला दिले. शिवाय त्या कंपनीच्या माध्यमातून त्यावर कामही केले. हा प्रकार उघड होताच रामनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी चौकशीअंती पाच जणांवर कलम ४२०, ३४ सहकलम ४३ बी, डी, एच.आय.जे. ६५.६६ माहिती तंत्रज्ञान कायदा २००, सुधारीत सन २००८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सुत्रानुसार, २८ मार्च रोजी डॉल्फीन लॉजीक सिस्टीम्स प्रा.लि. वर्धाचे संचालक कुणाल राजेंद्र राऊत (३६) रा. गोंडप्लॉट यांनी रामनगर ठाण्यात तक्रार दिली. डॉल्फीन लॉजीक सिस्टीम्स प्रा.लि. ही कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार नोंदणीकृत असून २००८ पासून सुरू आहे. सदर कंपनीने नोंदणीकृत कार्यालय गोंड प्लॉट येथे आहे. ही कंपनी मोबाईल अ‍ॅप्स्, वेबसाईट तयार करणे आणि नेटवर्क सोल्युशन इत्यादी मध्ये काम करीत आहेत. याकरिता २०१३-१४ पासून पाच लोकांची नियुक्ती केली आहे. त्यांनी रिंगव्ही नावाचे जीपीएस. ट्रॅकींग अ‍ॅप व असे इतर अनेक अ‍ॅप तयार केले. यापैकी एका कर्मचाऱ्याने आॅक्टोबर २०१७ पासून कार्यालयात येणे बंद केले.त्यावेळी पासून कंपनीतील एक व्यक्ती व कंपनी सोडून गेलेला व्यक्ती यांनी संगणमत करून डॉल्फीन कंपनीचे मोबाईल अ‍ॅप, सॉफ्टवेअर संबंधाने सोर्सकोडचा वापर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृतपणे वापर केला. डॉल्फीन कंपनीतील कर्मचारी विक्की तेलरांधे, निलेश जोगे यांनी सदर कंपनीतून कोणताही अधिकृत राजीनामा न देता कंपनीची फसवणूक करून मडी रोड टेक्नॉलॉजी प्रा.लि. या नोयडा, दिल्ली येथे रजिस्टर असलेल्या बंगलोर बेस कंपनीकरिता वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्याचे काम केले.विक्की तेलरांधे व निलेश जोगे यांनी डॉल्फीन कंपनीची गोपनीय व मौल्यवान बौद्धिक संपदा दुसºया कंपनीकरिता वापरून कंपनीशी केलेल्या करांराचे उल्लंघन करून कंपनीची फसवणूक केली आहे. तसेच मडी रोड टेक्नॉलॉजीज प्रा.लि. या नोयडा दिल्लीमध्ये असलेल्या कंपनीच्या डायरेक्टर शौर्य शहा आणि चीफ टेक्नीकल आॅफीसर सौरभ मिसाळ यांनी विक्की तेलरांधे व निलेश जोगे यांच्याकडून त्यांची पूर्वीची कंपनी सोडल्याबाबत कोणतेही कागदपत्र न घेता त्यास कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली. यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकाराची तक्रार येताच वर्धा शहर व सायबर सेल यांनी बापूजीवाडी, रामनगर वर्धा येथील साल्कचे कार्यालयात पंच, टेक्नीशियन व पोलीस स्टाफसह छापा घातला असता तेथे निलेश जोगे, विक्की तेलरांधे, चेतन धांमदे, सुरज पारिसे व शुभांगी बकाने हे काम करीत असताना मिळून आले. त्यांना सदर कंपनीचे अधिकृत व नोंदणीकृत असल्याबाबत कागदपत्र विचारले असता कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही कंपनी अनधिकृतरित्या सुरू असल्याचे दिसून आल्याने लॅपटॉप, संगणक, मोबाईल, डोंगल, डाटा कार्ड, किबोर्ड, माऊस व इतर साहित्य असून एकूण १ लाख ८९ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली.सदर कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक एन.यु. खेकाडे, कुलदीप टांकसाळे, जगदीश चव्हाण, निलेश कट्टोजवार, रितेश शर्मा, मंगेश चावरे, अनुप कावळे, दिनेश बोथकर, अभिजीत वाघमारे, संगीता तामगाडगे व शहर पोलिसांनी केली.कंपनीचे तंत्रज्ञान वापरले अथवा नाही या बाबत तपास सुरूगुन्ह्यात डॉल्फीन या कंपनीची बौद्धीक संपदा, सॉफ्टवेअर, मोबाईल अ‍ॅपचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. काय याबाबत तपास सुरू आहे. त्यासंबंधाने पुरावा प्राप्त होताच व आरोपी निष्पन्न होताच गुन्ह्यात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा