चरखा, सूत कताई व खादीला स्वतंत्र दर्जा

By Admin | Updated: December 21, 2015 02:13 IST2015-12-21T02:13:40+5:302015-12-21T02:13:40+5:30

शासनाने हाताने काढलेल्या सूतकताईस व कपड्याला खादीचा दर्जा दिला. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याला मात्र यांत्रिक गटात समाविष्ट केले.

Spinning wheel, yarn spinning and khadi independent status | चरखा, सूत कताई व खादीला स्वतंत्र दर्जा

चरखा, सूत कताई व खादीला स्वतंत्र दर्जा

चंद्रकांत पाटील : शहिदांना वाहिली श्रध्दांजली, स्वातंत्र्यलढ्याचा लघुपटही पाहिला
आष्टी (शहीद) : शासनाने हाताने काढलेल्या सूतकताईस व कपड्याला खादीचा दर्जा दिला. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याला मात्र यांत्रिक गटात समाविष्ट केले. यामुळे चरखा, सूतकताई व खादीला स्वतंत्र दर्जा मिळवून देण्यासाठी कायद्यात बदल करण्याबाबत राज्य शासनाकडून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शनिवारी त्यांनी शहीद भूमी आष्टीत चरखा केंद्राला भेट देत कापड प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. शिवाय त्यांनी आष्टीतील स्वातंत्रलढ्याचा चित्रपट पाहून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. तसेच आष्टीच्या सर्वांगिन विकासासाठी शासनाकडून भरघोस मदत करण्याचे आश्वासनही दिले. ना. पाटील यांचे आगमन होताच महाआॅरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. चरखा केंद्रात कृषी समुध्द प्रकल्पाचे अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी सूतमाला देत त्यांचे अभिवादन केले. चरखा प्रकल्पात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यामधून अखंड सूतकताई करून कापड प्रक्रिया होते. सदर कापड पाँडीचेरी येथे पाठवून त्यापासून विविध प्रकारचे शर्ट व तत्सम कापड विक्रीसाठी येते, अशी माहिती त्यांना राहूल ठाकरे यांनी दिली. सौरऊर्जेवरील खादी कापड तयार करण्याला पेटेंट मिळाल्याची माहिती ना. पाटील यांना यावेळी देण्यात आली.

Web Title: Spinning wheel, yarn spinning and khadi independent status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.