वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती द्या

By Admin | Updated: February 6, 2016 02:13 IST2016-02-06T02:13:34+5:302016-02-06T02:13:34+5:30

रेल्वे प्रशासनाच्यावतीने वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आला आहे. मंजुरीला मोठा कालावधी झाला असून काम थंडबस्त्यात आहे.

Speed ​​up the Wardha-Yavatmal-Nanded railway route | वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती द्या

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती द्या

रामदास तडस : रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करताना मांडल्या २७ समस्या
वर्धा : रेल्वे प्रशासनाच्यावतीने वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आला आहे. मंजुरीला मोठा कालावधी झाला असून काम थंडबस्त्यात आहे. नागरिकांकरिता आवश्यक असलेल्या या मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी खा. रामदास तडस यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना केली. शिवाय विविध समस्या त्यांनी यावेळी मांडल्या.
येत्या २५ फेब्रुवारी रोजी रेल्वे बजेट सादर करणार आहेत. वर्धा येथून पुणे व मुंबई येथे बरेच विद्यार्थी रोजगाराच्या शोधात गेले आहे. त्यांना तेथून वर्धेला येण्याकरिता विशेष गाडी नाही. यामुळे महात्मा गांधी यांच्या नावे सेवाग्राम-मुंबई व विनोबा भावे यांच्या नावे वर्धा-पुणे अशा दोन नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्ग काम चालू आहे. परंतु रेलमार्गाला गती नसल्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. करिता प्रकल्पाला गती प्रदान करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Speed ​​up the Wardha-Yavatmal-Nanded railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.