पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे प्रकल्पाला गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:39 IST2019-07-02T21:39:03+5:302019-07-02T21:39:18+5:30
ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळवारी शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय प्रभावीपणे मांडला.

पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे प्रकल्पाला गती द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळवारी शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय प्रभावीपणे मांडला.
२०१४ नंतर केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरीत्या पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या प्रकल्पाला पुंजीनिवेश कार्यक्रमाच्या माध्यमातून बजेटमध्ये स्थान दिले आहे. याकरिता निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच सदर प्रकल्प योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. शिवाय आर्वी-वरुड या नवीन रेल्वे मार्गाला प्रथमच मंजुरी प्रदान करण्यात आली;पण या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कार्य प्रलंबित आहे. हे दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्प या भागासाठी महत्त्वपूर्ण असून त्याला प्रशासकीय स्तरावर गती देण्याची मागणी खा. रामदास तडस यांनी केली.
या विषयी लवकरच रेल्वे मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याकरिता रेल्वे मंत्री पीयूष गोयल सकारात्मक असल्याचे उत्तर यावेळी संबंधितांनी दिल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे.