दाभोळकर व पानसरेंच्या हत्येच्या तपासाला गती द्या
By Admin | Updated: May 23, 2015 02:22 IST2015-05-23T02:22:30+5:302015-05-23T02:22:30+5:30
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन २१ महिने तर कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांची हत्या होऊन ४ महिने झाले.

दाभोळकर व पानसरेंच्या हत्येच्या तपासाला गती द्या
संघटनांची मागणी : वर्ष व महिने लोटूनही तपास थंडबस्त्यात
वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन २१ महिने तर कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांची हत्या होऊन ४ महिने झाले. अद्याप यातील आरोपी किंवा हत्येमागील सुत्रधारांचा साधा सुगावाही लागलेला नाही. तपासाला गती द्यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना विविध पुरोगामी संगठनांच्या वतीने निवेदन सादर केले.
२० आॅगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात सकाळी फिरत असताना गोळ्या झाउून हत्या करण्यात आली. तसेच १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे डॉ. गोविंद पानसरे पत्नीसह सकाळी फिरत असताना दोघांवरही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या यात २० फेब्रुवारी रोजी डॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला. डॉ. दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी पक्ष म्हणून भाजप-शिवसेना होती. तर डॉ. पानसरे यांची हत्या झाली तेव्हा भाजपा-शिवसेना सत्तेवर तर विरोधी पक्ष म्हणून कॉग्रेस-राष्ट्रवादी आहे. परंतु सध्या कुणीही बोलायला तयार नाही. या दोन्ही प्रकरणी तपासाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात निवेदन देताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, दिलीप उटाणे, नूतन माळवी, सुधीर पांगुळ, श्रेया गोडे, सिद्धार्थ तेलतुंबडे, मारोती इमडवार, वसू कोकणकर, मैना मिसाळ, नरेंद्र कांबळे, डॉ. बुटले, प्रकाश कांबळे , अॅड. जाधव, सारिका डेहणकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)