जमिनीतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:39+5:30
पश्चिम विदर्भात मागील पंधरवाड्यापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. अशातच ढगाळी वातावरणामुळे पाहिजे तसा सुर्यप्रकाश उभ्या पिकांना सध्या मिळत नसून जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण घटत आहे. याचाच परिणाम सध्या उभ्या सोयाबीन पिकांवर दिसून येत असून उभे पीक अचानक पिवळे पडत आहे.

जमिनीतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सततच्या पाऊस, ढगाळ वातावरण तसेच जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण घटत असल्याने उभे सोयाबीन पीक सध्या पिवळे पडत असल्याचा दावा सेलसुरा येथील कृषी तंत्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केला आहे.
पश्चिम विदर्भात मागील पंधरवाड्यापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहे. अशातच ढगाळी वातावरणामुळे पाहिजे तसा सुर्यप्रकाश उभ्या पिकांना सध्या मिळत नसून जमिनीतील ऑक्सिजनचे अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण घटत आहे. याचाच परिणाम सध्या उभ्या सोयाबीन पिकांवर दिसून येत असून उभे पीक अचानक पिवळे पडत आहे. ज्या शेतात पावसाचे अधिक पाणी साचलेले आहे त्या शेतमालकाने चर काढून शेताबाहेर साचलेले पावसाचे पाणी काढावे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. अशातच सोयाबीन पिकाला पाहिजे तसा सुर्यप्रकाश प्रकाशसंषलेशनासाठी कमी पडत आहे. अशातच सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत असले तरी शिरा मात्र हिरव्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पॉटेशियम नायट्रेट (१३.४.४५) (१०० ग्रॅम/१० लिटर पाणी)ची फवारणी करावी, असा सल्ला डॉ. उंबरकर यांनी दिला आहे.
हवेतील आर्द्रतेमुळे पानासह शेंगांवर ठिपके
सोयाबीन पिकाच्या पानांसह शेंगावर ठिपक्यांचे प्रमाणे हवेतील अधिक आर्द्रतेमुळे वाढल्याचे दिसून आले आहे. सोबतच खोडमाशी आणि चक्रभुंगा किडीचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पिकांवर औषधांची फवारणी करावी.