अनुउपस्थितीमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:23+5:30
सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनच्या शेंंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाने भरले नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहे.बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही.

अनुउपस्थितीमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाड भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करीत नसल्याने प्रहारने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देत मंगळवारी आंदोलन केले. सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनच्या शेंंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाने भरले नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहे.बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक सोयाबीनच्या कंपनीकडून झाली असून या बाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी शेतकरी गेले असता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मिळून न आल्याने त्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देण्यात आले.