सेलू तालुक्यात वाढणार सोयाबीनचा पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:21+5:30
सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

सेलू तालुक्यात वाढणार सोयाबीनचा पेरा
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : दुबार पीकक्षेत्र वाढविण्याचा शासनाचा भर असून कपाशीनंतर गहू पिकाची लागवड व्हावी, हा उद्देश असला तरी सेलू तालुक्यात यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. सेलू तालुक्यात बागायती शेती असल्याने या भागातील केळीच्या बागा घटल्याने बहुतांश शेतकरी लांब धाग्यांचा कापूस उत्पादन करण्यावर भर देतो. पण, यावर्षी सततची नपिकी व कपाशीला मिळणारा भाव हा परवडणारा नसल्याने मागील हंगामात ३० हजार ५१० हेक्टरमध्ये असणारा कापसाचा पेरा २९ हजार १९० हेक्टरमध्ये राहण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे.
यावर्षी कृषी विभागाच्या नियोजनात कापसाचा पेरा घटणार असल्याचे दिसून येत आहे. मागील खरिप हंगामात संकरित ज्वारी २१ हेक्टर, कापूस ३०५१० हेक्टर, सोयाबीन १० हजार ५० हेक्टर, तूर ६६०० हेक्टर, मूग ३ हेक्टर, उडीद २ हेक्टर असा पेरा होता. यावर्षी कृषी विभागाच्या नियोजनात संकरित ज्वारी ५० हेक्टर, भुईमुंग २० हेक्टर, मूंग ४५, उडीद ५०, आणि मका ५० हेक्टरपर्यंत पेरा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कपाशी हे नगदी पीक म्हणून ओळखल्या जात होते आता कपाशीकडे दरवर्षी शासन दुर्लक्ष करीत आहे. कापसाचा दर वाढेल ही आशा आता मावळली आहे. त्यामुळे बागायती तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू तालुक्यात यावेळी सोयाबीनच्या पेºयात मोठी वाढ होवून कपाशी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
तुरीचा पेरा वाढणार यावर्षी तुरीला मिळालेला भाव. आलेले उत्पादन काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा दायक होते. तूर हे आंतरपीक असल्याने शेतकºयांना परवडणारे आहे. कपाशीत आंतरपीक घेणारे शेतकरी यावर्षी सोयाबीनमध्ये तूर हे आंतर पीक घेणार असल्याचे दिसून येत आहे.
८१९६ क्विंटल बियाण्यांची मागणी
कृषी विभागाकडून येणाऱ्या खरिप हंगामात ८१९६ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यात ज्वार ४ क्विंटल, कपाशी ६९३ क्विंटल, सोयाबीन ७०८८ क्विंटल, भुईमुंग २० क्विंटल, तूर ३६० क्विंटल, मूंग ६ क्विंटल, उडीद ६ क्विंटल, मका १९ क्विंटल, अशी ८१९६ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे.
दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. घरचेच बियाणे वापरावे, पण त्याची उगवण क्षमता तपासून पाहवी, कडधान्य क्षेत्र वाढवावे, शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी संपर्क करावा.
- एस. आर. मुरारकर, कृषी अधिकारी, पंचायत समिती, सेलू.