सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:37 IST2018-07-02T22:37:10+5:302018-07-02T22:37:27+5:30
पढेगाव येथील शेतकरी अरविंद तडस यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र त्यांनी पेरलेले वाण उगवले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तक्रार त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वर्धा यांच्याकडे केली आहे.

सोयाबीन बियाणे उगवलेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : पढेगाव येथील शेतकरी अरविंद तडस यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र त्यांनी पेरलेले वाण उगवले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तक्रार त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वर्धा यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, सोयाबीनचे ‘निर्मल ८४’ हे बियाणे आपण वापरले त्याची खरेदी वर्धा येथील एका कृषी सेवा केंद्रातून करण्यात आली होती. ६ बॅग बियाणे घेण्यात आले होते.
२ हजार ४०० रुपये प्रती बॅग प्रमाणे १४ हजार ४०० रुपये खर्च करण्यात आला. मात्र बियाणे उगवले नाही. या ६ बॅग बियाण्यासाठी ५ हजार ७४२ रुपयाचे खत व पेरणीसाठी २ हजार रुपये पेरणीखर्च, तसेच महिला मजूरांचा १ हजार २०० रुपये खर्च झाला बियाण्यांची उगवण न झाल्याने आपल्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अरविंद तडस या शेतकºयाने केली आहे.