तीन हजार हेक्टरने घटणार सोयाबीनचे क्षेत्र
By Admin | Updated: May 24, 2014 23:49 IST2014-05-24T23:49:55+5:302014-05-24T23:49:55+5:30
गत खरीप हंगामाच्या तुलनेत सन १४-१५ च्या हंगामात सोयाबीनचा पेरा तीन हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविला जात आहे. सोयाबीन कमी करून

तीन हजार हेक्टरने घटणार सोयाबीनचे क्षेत्र
घोराड : गत खरीप हंगामाच्या तुलनेत सन १४-१५ च्या हंगामात सोयाबीनचा पेरा तीन हजार हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविला जात आहे. सोयाबीन कमी करून शेतकरी कपाशीची लागवड करणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. ४३ हजार ८९0 हेक्टर क्षेत्रात सेलू तालुक्यात खरीप हंगामाताचा पेरा करण्यात येत आहे. यात कपाशीची लागवड २१ हजार हेक्टरमध्ये करण्यात येणार आहे. यात एक हजार हेक्टरची वाढ अपेक्षित धरल्या गेली आहे. तर कृषी विभागाच्या खरीप नियोजनानुसार गत हंगामात १९ हजार हेक्टरमध्ये असलेल्या सोयाबीनचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने कमी होवून १७ हजार हेक्टरवर राहील. तर ज्वारी ३00 हेक्टर तूर क्षेत्रात ४ हजार हेक्टरवरून पाच हजार ५00 हेक्टरवर पोहचतील तर इतर पिके ९0 हेक्टर मध्ये आहेत. सन १३-१४ च्या हंगामात ४३ हजार ८७१ हेक्टरमध्ये असणार्या खरीप पीक क्षेत्रात यंदा १९ हेक्टरची वाढ दर्शविली आहे. खरीप हंगामासाठी १0 हजार ३३८ क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहे. कापूस पेरणीकरिता ९३ हजार ३३४ पाकीटे बियाणे लागतील तर रासायनिक खताची मागणी ८ हजार २१५ मेट्रीक टन असून १ हजार ३३५ मेट्रीक टन उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले. कृषी विभागाचे खरीप पिकाबाबतचे नियोजन झाले असले तरी शेतकर्यांचे नियोजन हे रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसाच्या हजेरीवर अवलंबुन राहिले आहे. शेतकर्यांनी मशागतीची कामे आटोपली असून त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)