२२ हजार २६७ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:22+5:30

जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर हे मुख्य पीक घेतात. मागील वर्षी खरीप हंगामात २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर कपाशी, २ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीन आणि ६० हजार १३२ हेक्टवर तुरीची लागवड झाली होती. मागील वर्षी जिल्ह्यात नेमका किती कापूस होईल याचा कृषी विभागाकडून वर्तविलेला अंदाजच कापूस खरेदी सुरू झाल्यावर चूकला होता.

Soybean area increased by 22 thousand 267 hectares | २२ हजार २६७ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढले

२२ हजार २६७ हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढले

ठळक मुद्देकपाशी अन् तुरीच्या लागवड क्षेत्रात घट। अल्प दरात विकावा लागला होता कापूस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात तब्बल २२ हजार २६७.९७ हेक्टरने वाढ झाली असून कपाशी आणि तुरीच्या क्षेत्रात कमालीची घट झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. नवीन खरीप हंगाम सुरू होऊनही अनेकांच्या घरात कापूस शिल्लक राहिल्याने आणि पाहिले तसा भाव न मिळाल्याने यंदा कपाशीचे क्षेत्र घटल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर हे मुख्य पीक घेतात. मागील वर्षी खरीप हंगामात २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर कपाशी, २ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीन आणि ६० हजार १३२ हेक्टवर तुरीची लागवड झाली होती. मागील वर्षी जिल्ह्यात नेमका किती कापूस होईल याचा कृषी विभागाकडून वर्तविलेला अंदाजच कापूस खरेदी सुरू झाल्यावर चूकला होता. शिवाय मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने शासकीय कापूस खरेदीलाही ब्रेक लागला. याच संधीचे सोन काही खासगी व्यापाऱ्यांनी करून घेत शेतकऱ्यांकडील कापूस कवडीमोल भावात खरेदी केला. त्याचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीलाच दिसून येत आहे. यंदा २ लाख १२ हजार ८६३.८९ हेक्टरवर कपाशी, १ लाख २९ हजार ४९४.९७ हेक्टरवर सोयाबीन आणि ५४ हजार ८१० हेक्टवर तुरीची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या तूर, सोयाबीन आणि कपाशीच्या लागवड क्षेत्राचा विचार केल्यास सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ तर कापूस आणि तुरीच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट आल्याचे दिसून येत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याला दुय्यम स्थान
मागील वर्षीय हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विक्री करावा लागल्याने यंदाच्या वर्षीय जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी पांढरे सोन म्हणून ओळख असलेल्या कपाशीच्या पिकाला दुय्यम स्थान दिल्याचे कृषी विभागाच्या यंदाच्या पेरणी अहवालावरून दिसून येत आहे. यंदा २२ हजार ९३.११ हेक्टरने कपाशी तर ५ हजार ३२१.८५ हेक्टरने तुरीचे लागवड क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कापूस आणि तुरीचे उत्पन्नही घटणार आहे.

चारपट वाढले मक्याचे क्षेत्र
जनावरांसाठी वैरण म्हणून अनेक शेतकरी मका पिकाची लागवड करतात. शिवाय भरपूर जीवनसत्व असलेल्या मक्याचे सेवन अनेक नागरिक करतात. मागील वर्षी केवळ ३८० हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. तर यंदा १ हजार ६२५.०६ हेक्टरवर मक्याची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा चारपट मक्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

३९० हेक्टरने ऊसाचे क्षेत्र घटले
मागील वर्षी खरीप हंगामात ७६८ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. पण यंदाच्या वर्षी याच पिकाच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ३७८ हेक्टरवरच ऊसाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. साखर कारखाना असतानाही ऊसाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे, हे विशेष.

Web Title: Soybean area increased by 22 thousand 267 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती