सोयाबीन ठरतेय ‘नाकापेक्षा मोती जड’

By Admin | Updated: October 28, 2014 23:02 IST2014-10-28T23:02:11+5:302014-10-28T23:02:11+5:30

मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे सोयाबीनचे पीक हातचे गेले तर यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती त्यापेक्षाही दयनिय झाली़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी

Soyabean decides 'pearl thick' than naka | सोयाबीन ठरतेय ‘नाकापेक्षा मोती जड’

सोयाबीन ठरतेय ‘नाकापेक्षा मोती जड’

खरांगणा (मो़) : मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारे सोयाबीनचे पीक हातचे गेले तर यावर्षी पावसाने दगा दिल्याने पिकांची स्थिती त्यापेक्षाही दयनिय झाली़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेल्याचे दिसते़ यंदाचे सोयाबीन पीक शेतकऱ्यांना ‘नाकापेक्षा मोती जड’ ही म्हण सार्थ ठरवित असल्याचा प्रत्यय येत आहे़
१०० ते ११० दिवसांत येणाऱ्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची भीस्त असते. रबी हंगामासाठी सोयाबीनमुळे शेतकऱ्यांच्या हातात तीन महिन्यांत पैसा येतो़ कर्ज काढून मशागत करून पेरलेल्या या पिकामुळे हाती रक्कम आल्याने आपल्या मुला-बाळांना कपडेलत्ते घेऊन दिवाळी साजरी केली जाते़ थोडेबहूत कर्जाचेही देणे होते तर रबीच्या बी-बियाणे, खते, मजुरी यांचीही सोय लागते; पण दोन वर्षांपासून निसर्गाच्या दगलबाजीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षी अतिपावसाने सोयाबीन पिकांना अंकुर फुटले, ते काळे झाले. यामुळे उतारा आला नाही व बाजारात कवडीमोलाने विकावे लागले़ यंदाची शेतात झाड आहे, पाला आहे; पण सोयाबीनच्या शेंगांत दाणेच भरले नाही. तुरीपेक्षाही ठोकळ असणारे दाणे ज्वारीच्या आकाराचे झाले़ शेंड्यावरील शेंगा पोचटच असल्याचे दिसते़ शेतीची वाहीपेरी, बियाणे, खते, निंदण, डवरण, राखण, फवारणी असा एकरी १० ते १५ हजार रुपयांचा खर्च करूनही उतारा मात्र दीड ते दोन क्विंटलच येत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. यात मागील वर्षीच्या तुलनेत भावही अर्ध्यावर आले आहेत़ शेतकरी सुलतानी संकटातही भरडला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाकापेक्षा मोती जड झाल्याचेच दिसून येते़
भ्

Web Title: Soyabean decides 'pearl thick' than naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.