जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 06:00 AM2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे ...

Sowing of Rabi in the district is 38.55 percent | जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

जिल्ह्यात रबीची पेरणी ३८.५५ टक्के

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने खरिपात नुकसान तरी शेतकऱ्यांकडून गती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परतीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतरही रबीच्या पेरण्यांना गती आली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचेनियोजनाचे क्षेत्र ९१ हजार ५६० इतके होते. एकूण सरासरी क्षेत्र ५१ हजार ५३८ हेक्टर असून पैकी सोमवारपर्यंत १९ हजार ८६८ म्हणजे हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ३८.५५ टक्के क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.
रबी हंगामात आर्वी तालुक्यात सरासरी १५० हेक्टर, आष्टी (शहीद) तालुक्यात ५२४ हेक्टर, कारंजा (घाडगे) ९८८, वर्धा तालुक्यात १ हजार २७०, सेलू तालुक्यात ५ हजार ५००, देवळी तालुक्यात २ हजार २९५, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १३७.१, समुद्रपूर तालुक्यात ७ हजार ५ हेक्टरवर पेरण्या सोमवार, २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
परतीच्या पावसाने जिल्ह्याला यंदा अक्षरश: झोडपून काढले. सवंगणी केलेल्या सोयाबीनच्या गंज्या भिजल्याने अंकुर फुटले. कपाशीची बोंडेही काळपट आली. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र, नंतर पावसात फार मोठा काळ सातत्य राहिले. यामुळे पिकेही जोमात बहरली होती.
यंदा चांगले उत्पन्न होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, परतीच्या पावसाने पिकांवर विपरित झाला. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला.
सोायाबीनचे दाणे ओलेच राहिल्याने बाजार समितीतही प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळाला. कपाशीची बोंडेच न फुटल्याने दसऱ्याला घरात येणारा कापूस अद्याप अनेकांच्या शेतातच आहे. खरिपातील या दोन्ही पिकांनी दगा दिल्याने अनेकांंचा लागवड खर्चदेखील निघाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरिपातील पिकांवरच शेतकऱ्यांचे नियोजन असते.
मात्र, या हंगामातच शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कटले. असे असतानाही रबीच्या पेरणीकरिता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून आता या हंगामातील पेरण्यांना गती आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.

पेरण्यांमध्ये समुद्रपूर, सेलू आघाडीवर
रबी हंगामातील पेरणीमध्ये समुद्रपूर आणि सेलू तालुका आघाडीवर असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. तृणधान्य जसे मका, गहू, ज्वारी, कडधान्य- हरभरा व इतर, अन्नधान्य, गळीत धान्य, भाजीपाला पिकांच्या लागवडी जिल्ह्यातील समुद्रपूर आणि सेलू तालुक्याने आघाी घेतली आहे.

ज्वारीकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
जिल्ह्यात ज्वारी लागवडीचे ६६० हेक्टर नियोजन क्षेत्र होते. मात्र, ज्वारीची संपूर्ण जिल्ह्यात लागवडच करण्यात आली नाही. ज्वारी पिकाकडे शेतकरी दरवर्षीच पाठ फिरवित असल्याने चाराटंचाईचे संकटही जिल्ह्यात गडद होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Sowing of Rabi in the district is 38.55 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती