कोविड रुग्ण सापडताच शिरुड होतेय निर्जंतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:15+5:30
कोरोना बाधित असल्याचे पुढे आल्यावर संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. शिवाय ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात औषधांची फवारणी केली जात आहे. रुग्ण आढळल्याने या परिसरात क्लस्टर कृती योजना अंमलात आणल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

कोविड रुग्ण सापडताच शिरुड होतेय निर्जंतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : नजीकच्या शिरुड या गावात मुंबई येथून आलेले दाम्पत्य कोरोना बाधित असल्याचे पुढे आल्यावर संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. शिवाय ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात औषधांची फवारणी केली जात आहे. रुग्ण आढळल्याने या परिसरात क्लस्टर कृती योजना अंमलात आणल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
मुंबई येथून आलेल्या दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. शिवाय ग्रामसेवक अजया झामरे या नोडल अधिकारी म्हणून जबाबदीरी पार पाडत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिरुड गावातील प्रत्येक वॉर्डात औषधांची फवारणी केली जात आहे.
तर गावात गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे खबरदारीच्या उपायांची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
अल्लीपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून या भागात वेळोवेळी गस्त घातली जात आहे. कंटेन्मेंट व बफर झोन परिसरातील रहिवाशांना कुठल्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून विशिष्ट नियोजन करण्यात आल असल्याचे ग्रामसेवक अजया झामरे यांनी सांगितले.
गावात शांतता रहावी तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून वाल्मिक भांदकर, जया उकुडकर, चंद्रपाल थुल, खुशाल सुरजूसे, समीर घुसे आदी सहकार्य करीत आहेत.