काही नोटांवर डॉ.आंबेडकरांचे छायाचित्र घ्यावे - रिपाइंची मागणी
By Admin | Updated: January 18, 2017 00:43 IST2017-01-18T00:43:09+5:302017-01-18T00:43:09+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा वापर चलनी नोटांवर करण्यात यावा,

काही नोटांवर डॉ.आंबेडकरांचे छायाचित्र घ्यावे - रिपाइंची मागणी
वर्धा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा वापर चलनी नोटांवर करण्यात यावा, अशी मागणी रिपाइंच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.
भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र आहे. गांधीजींचे कार्य देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे. दलित आणि पिडीतांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय डॉ. आंबेडकर यांनाच जाते. भविष्यात चलन बदल केल्यास काही मोठ्या नोटांवर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा वापर करावा, अशी मागणी निवेदनातून केली.(स्थानिक प्रतिनिधी)