दुचाकी खाईत आदळून एक ठार

By Admin | Updated: April 27, 2016 02:17 IST2016-04-27T02:17:03+5:302016-04-27T02:17:03+5:30

मित्राला घेऊन कुऱ्हा येथे लग्नाला जात असलेल्या युवकाची दुचाकी अनियंत्रित होऊन खाईत कोसळली.

A soldier collapsed into a ditch | दुचाकी खाईत आदळून एक ठार

दुचाकी खाईत आदळून एक ठार

वाढोणा शिवारातील घटना
आर्वी : मित्राला घेऊन कुऱ्हा येथे लग्नाला जात असलेल्या युवकाची दुचाकी अनियंत्रित होऊन खाईत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाढोणा परिसरात घडली.
पंकज नरेश वानखडे (२२) असे मृतकाचे तर नीरज सुधाकर चाफले (२०) असे जखमीचे नाव आहे. दोघे सालोड (हिरापूर) येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सूत्रानुसार, पंकजच्या मामेबहिणीचे कुऱ्हा येथे लग्न होते. त्यामुळे पंकज आणि त्याचा मित्र नीरज हे दोघे एम.एच.३२ एस.९८६९ या दुचाकीने सालोडवरून अमरावतीला जाण्याकरिता निघाले. दरम्यान सकाळी १० वाजताच्या सुमारास वाढोणा शिवारातील घाटात त्याची दुचाकी अनियंत्रित झाल्याने दोघेही खाईत कोसळले. याच मार्गाने आर्वीकडे येत असलेल्या एका मोबाईल युनिटच्या गाडीला ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ दोघांनाही आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंकजला मृत घोषित केले तर नीरज गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेचा तपास आर्वी पोलीस करीत असून वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: A soldier collapsed into a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.