सौर पथदिव्यांना बंदची घरघर
By Admin | Updated: October 24, 2016 00:33 IST2016-10-24T00:33:21+5:302016-10-24T00:33:21+5:30
परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने गावात सौर उर्जेवरील पथदिवे लावले आहे. मात्र पथदिवे बंद असल्याने ते शोभेची वस्तू ठरत आहे.

सौर पथदिव्यांना बंदची घरघर
काळोख कायम : दुरुस्तीबाबत उदासीनता
कोरा : परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने गावात सौर उर्जेवरील पथदिवे लावले आहे. मात्र पथदिवे बंद असल्याने ते शोभेची वस्तू ठरत आहे.
सौर उर्जेवरील पथदिवे समाजकल्याण विभाग, कृषी विभाग यांच्यामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे. एका सौर पथदिव्याकरिता किमान १७ हजार ५०० रूपये खर्च येतो. असे असतानाही पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. यातील दिवे अचानक बंद पडतात. ग्रामपंचायत प्रशासन हे पथदिवे सुरू करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे वास्तव आहे. यातील अनेक पथदिवे आजघडीला बंद पडले आहे. पथदिव्यांमधील बॅटरी चोरीला जाणे, त्यांची देखभाल न करणे यामुळे पथदिवे बंद पडत आहे. पथदिव्यांच्या बॅटऱ्याच चोरीला गेल्याने त्यात बॅटरी बसविलेली नाही. त्याची नोंद केली जात नाही. काही पथदिव्यांमधील बॅटऱ्या नादुरूस्त आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. सौर पथदिवे दुरूस्त करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.