विजेवरील पथदिव्यांजवळ लावले सौर उज्रेचे दिवे
By Admin | Updated: May 15, 2014 23:49 IST2014-05-15T23:49:40+5:302014-05-15T23:49:40+5:30
शासनाची कुठलीही योजना राबविताना त्यात गैरप्रकार कसा करता येईल, याचे प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधी करताना दिसतात. असाच प्रकार सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे.

विजेवरील पथदिव्यांजवळ लावले सौर उज्रेचे दिवे
सुधीर खडसे -समुद्रपूर शासनाची कुठलीही योजना राबविताना त्यात गैरप्रकार कसा करता येईल, याचे प्रयत्न अधिकारी व लोकप्रतिनिधी करताना दिसतात. असाच प्रकार सध्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये उघड झाला आहे. सौर उज्रेवरील दिव्यांची खरेदी ग्रा.पं. द्वारे करण्यात आली; पण गरज नसलेल्या ठिकाणी हे दिवे लावून शासनाचा पैसा व्यर्थ करण्यात आला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या ग्रामपंचायतीने १0 ऑक्टोबर २0१२ आणि ६ नोव्हेंबर २0१२ रोजी ५ नग सौर उज्रेवर चालणारे पथदिवे खरेदी केले. यासाठी १ लाख ७९ हजार ५00 रुपये खरेदी करण्यात आले. हे महागडे दिवे गावात आवश्यक ठिकाणी लावले जातील, असे अपेक्षित होते; पण असे झाले नाही. सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले सौर उज्रेवरील दिवे जेथे गरज नाही, अशा ठिकाणी लावण्यात आले. ग्रा.पं. पदाधिकार्यांच्या घरावजळ आधीच विजेवर चालणारे पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या शेजारील परिसरात सौर उज्रेवरील महागडे बल्ब बसविण्यात आलेत. यापैकी एक सौर उज्रेवरील दिवा स्मशानभूमीत लावण्यात आला. हा दिवा गत तीन महिन्यांपासून बंद पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्यात; पण तो दिवाही दुरूस्त करण्यात आलेला नाही. सौर उज्रेवरील पथदिव्यांच्या खरेदीचा माजी सरपंच जयश्री धोटे यांनी सरपंच असताना विरोध केला होता. शिवाय ग्रामसभेनेही या खरेदीला विरोध दर्शविला होता. कमिशनच्या लोभापायी काही राजकीय नेत्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी ही खरेदी करण्यात आली. शिवाय ग्रा.पं. मध्ये असलेल्या या नेत्यांचे हितसंबंध व संख्याबळ अधिक असल्याने ग्रा.पं. च्या आर्थिक परिस्थितीची तमा न बाळगता सौर उज्रेवरील दिव्यांची खरेदी करण्यात आली. या व्यवहारावरही ग्रामस्थ तसेच ग्रा.पं. सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. सौर उज्रेवरील दिव्यांच्या खरेदीची तसेच ते कुठे व कोणत्या कारणातून लावण्यात आलेत, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.