वृक्ष लागवडीत सामाजिक वनीकरणची झाडे जिवंत
By Admin | Updated: December 3, 2014 22:56 IST2014-12-03T22:56:20+5:302014-12-03T22:56:20+5:30
तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाद्वारे अनेक गावांत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली़ योग्य नियोजनाअभावी संपूर्ण झाडे जिवंत आहे; पण ग्रा़पं़ मार्फत लावलेली झाडे

वृक्ष लागवडीत सामाजिक वनीकरणची झाडे जिवंत
सेलू : तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाद्वारे अनेक गावांत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली़ योग्य नियोजनाअभावी संपूर्ण झाडे जिवंत आहे; पण ग्रा़पं़ मार्फत लावलेली झाडे २५ टक्केही तग धरून नाही़ केवळ ग्रा़पं़ च्या दुर्लक्षामुळे शासनाच्या योजनेला चुना लागला आहे़
सामाजिक वनिकरणच्या तालुका लागवड अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नियमित लक्ष ठेवणारी यंत्रणा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्येक ठिकाणी वारंवार होणाऱ्या भेटी, मजुराला नेमून दिलेली झाडे, झाड मेल्यास त्वरित दुसरे लावण्याची ताकीद, झाडांना नियमित पाणी, कुंपण साफसफाई यामुळे सेलू तालुक्यातील सामाजिक वनिकरणने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे जवळपास पूर्णत: जगली आहेत. लागवड अधिकारी गभने हे स्वत:च वृक्षपे्रमी असल्याने कामात कुणाचीही कुचराई सहन करीत नसल्याचे वृक्ष लागवडीनंतर झालेल्या नियोजनबद्ध संगोपनावरून लक्षात येते़ ग्रामपंचायतीद्वारे मनेरगांतर्गत करण्यात आलेली वृक्ष लागवड ग्रामसेवकांच्या दुर्लक्षितपणाची बळी ठरली आहे. लावलेल्या संपूर्ण झाडांपैकी अपवाद वगळता सर्व ग्रा़पं़ ची स्थिती सारखी आहे़ केवळ २५ टक्के झाडे जिवंत दाखविली तरी ग्रामसेवकांचा सन्मान करण्याची वेळ नाईलाजाने प्रशासनावर आल्यावाचून राहणार नाही़ प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मनेरगाच्या मजुरीत गैरप्रकार झाला. यामुळे दोषी ग्रामसेवकांच्या वेतनातून चौकशीअंती अपहार केलेली रक्कम वसूल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)