सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
By Admin | Updated: April 9, 2016 02:17 IST2016-04-09T02:17:46+5:302016-04-09T02:17:46+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सर्वांनी उत्स्फूर्तपणे सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्ताने डॉ. आंबेडकर सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. उद्घाटन सेवाग्राम मार्गावरील सामाजिक न्याय भवन येथे आ. डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे होत्या. यावेळी पंचायत समितीचे सदस्य अशोक कलोडे, माजी प्राचार्य सुभाष खंडारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, विशेष समाज कल्याण अधिकारी दीपा हेरोळे आदींची उपस्थिती होती.
आ.भोयर यांनी शासनामार्फत विविध कल्याणकारी निर्णय घेण्यात येत आहेत. विविध कल्याणकारी योजना शासनाच्या असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, खंडारे, रामटेके, हेरोळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. समतादूत रूपाली ठाकरे हिने डॉ. बाबासाहेबांवर आधारित ओवी गायिल्या व उपस्थितांची दाद मिळविली. प्रास्ताविक देशमुख यांनी केले. आभार रामटेके यांनी मानले.(प्रतिनिधी)