आतापर्यंत दीड लाखावर ॲन्टिजेन किट्सचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:15+5:30
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट कमी पडून लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या अचानक कोविड तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

आतापर्यंत दीड लाखावर ॲन्टिजेन किट्सचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून संशयितांची ॲन्टिजेन चाचणी केल्या जात आहे. आतार्यंत सुमारे दीड लाखांवर ॲन्टिजेन किट्सचा वापर करण्यात आला असल्याने आता मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन तपासणी किट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यक किट उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आल्या पावली परतावे लागत असून चाचण्या करायच्या कशा, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडू लागला आहे.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट कमी पडून लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या अचानक कोविड तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी, सेवाग्राम, उपजिल्हा रुग्णालयासोबतच ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या जास्त आहे. पण, ॲन्टिजेन किटचा तुटवडा असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णसंख्या वाढली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दररोज तीन हजारावर चाचण्या करण्यात येत असून ॲन्टिजेन चाचणी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रशासनाकडे ॲन्टिजेन किट्सची मागणी करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेकडे ॲन्टिजेन किट्स असून लवकरच आणखी किट्स उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.