शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सोमलगड जंगलात सापडला मानवी हाडांचा सांगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 13:08 IST

सेलडोह गावाजवळ असलेल्या सोमलगड जंगलात वन विभागाच्या चमूला गस्ती दरम्यान मानवी सांगाडा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तो मानवी सांगाडा सेलडोह येथील अशोक दौलत उईके याचा असल्याचे त्याच्या पत्नी व मुलाने सांगितले.

ठळक मुद्देगावकऱ्यांच्या मदतीने पटली ओळख

वर्धा : वर्धा-नागपूर सीमेवर असलेल्या सोमलगड बीट क्र.२५५ मध्ये असलेल्या परिसरात वन विभागाला गस्तीदरम्यान मानवी अवयव आढळून आले. याप्रकरणी सिंदी पोलिसांनी सेलडोह येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृताची ओळख पटविली असून तो मानवी सांगाडा सेलडोह येथील अशोक दौलत उईके (वय ५५, राहणार सेलडोह)  याचा असल्याचे त्याच्या पत्नी व मुलाने सांगितले.

सिंदी (रेल्वे) नजीकच्या सेलडोह गावाजवळ असलेल्या सोमलगड जंगलात मानवी सांगाडा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. वनकर्मचाऱ्यांनी केळझरचे वनपाल नंदकिशोर पाचपोर याना घटनेची माहिती दिल्यानंतर सिंदी (रे) पोलिसांना माहिती देण्यात आली. 

मृत अशोक उईकेची सोमलगड जंगलालगत शेती असल्याने तो शेतातील झोपडीतच राहत होता. पंधरा- पंधरा दिवस तो घरी येत नसल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली नसल्याचे सांगितले. अशोक हा शेतात असलेल्या झोपडीत व अनेकदा शेतातील झाडाखाली जंगलात दरी करुन राहायचा. दरम्यान, वनविभागातील कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान दुर्गंधी येत असल्याने जाऊन पाहिले असता विखुरलेले मानवी शरिराचे अवयव आढळून आले.

दोन वर्षांपूर्वी अशोकचा पाय मोडला होता. त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला होता. मृताच्या संगाड्याजवळ लोखंडी रॉड व नटबोल्ट आढळल्याने त्याच्या पत्नी व मुलाने हा अशोक उइकेचा मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले. अशोकच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुले आहेत. ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, पोलीस उपनिरीक्षक जयेंद्र नगराळे, दिलीप कडू, बळवंत पिंपळकर, संदीप सोयाम आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू