आर्वी उपविभागात दोन वर्षात सोळा हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:33+5:30
चोरी, मंगळसुत्र चोरी आदी घटनाही घडल्या असून निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याचेच दिसून आले आहे. आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस ठाण्याचा परिसर येतो. या परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन व पोलीस चौकीची निर्मिती केली आहे.

आर्वी उपविभागात दोन वर्षात सोळा हत्या
पुरूषोत्तम नागपुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : उपविभागीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हाचा आलेख दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील दोन वर्षातील गुन्ह्याचा मागोवा घेतला असता १६ हत्या करण्यात आल्या तर १६ लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यासोबत जबरी चोरी, मंगळसुत्र चोरी आदी घटनाही घडल्या असून निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याचेच दिसून आले आहे.
आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस ठाण्याचा परिसर येतो. या परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन व पोलीस चौकीची निर्मिती केली आहे. यातील बहूतांश पोलीस चौक्यातून गुन्ह्यावर आळा घालण्याऐवजी दारुविक्रेला प्रोत्साहन देण्याचेच काम चालत असल्याची ओरड होत आहे.
यासर्व पोलीस ठाण्यातच्या हद्दीत मागील दोन वर्षांमध्ये ११५ चोरीच्या घटना घडल्या असताना केवळ ४१ चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यासोबतच ४३ वाहने चोरीला गेले असून १८ वाहनेच पोलिसांच्या हाती लागले आहे. थकबाकीचे २० प्रकरण असून त्यापैकी ११ प्रकरणच उघडकीस आले आहे. या उपविभागात दंग्याचा १५ घटना घडल्या असून २२ ठिकाणी शासकीय कर्मचाºयावर हल्ले करण्यात आल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यासोबतच मुलींना पळवून नेणे, महिला व मुलींवरील अत्याचार, शारिरीक शोषण, अपघात अशा अनेक घटना घडल्या असून त्यांचीही नोद करुन पोलिसांनी तपास चालविला आहे.आर्वी उपविभागाअंतर्गत येणाºया
आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत ९०१ प्रकरण कायम करण्यात आले असून ७४० प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी दिली आहे. आर्वी उपविभागात आर्वी पोलीस स्टेशनमध्ये संपत चव्हाण, आष्टीत ठाणेदार जितेंद्र चांडे, कारंजा ठाणेदार राजेंद्र शेट्ये, तळेगाव पोलीस स्टेशनचे रवींद्र राठोड व खरांगणा पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार संजय गायकवाड कार्यरत आहेत.