आठवडाभरात सहा जनावरे दगावली

By Admin | Updated: February 19, 2015 01:27 IST2015-02-19T01:27:34+5:302015-02-19T01:27:34+5:30

सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे.

Six animals have died in the week | आठवडाभरात सहा जनावरे दगावली

आठवडाभरात सहा जनावरे दगावली

वर्धा : सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे. नागरिक केविलवाण्या नजरेने आपल्या मृतप्राय: जनावरांकडे बघत आहेत. त्यांच्या मृत्यूचे ठोस कारण कळत नसले तरी पशुवैद्यकीय अधिकारी विषारी वनस्पती जनावरांनी खाल्ल्याचा संशय व्यक्त करीत आहे, तर गावकरी मात्र ही बाब मानायला तयार नाही. उपायांचा विशेष उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
मोर्चापूर येथील अनेक नागरिक शेतीला पुरक दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे बैलांसह गायी व म्हशी आहेत. गत काही दिवसांसून गावातील जनावरे दगावण्याचे सत्र सुरू झाले आहे. यात संजय मधुकर काळे यांच्या चार म्हशी चार दिवसात दगावल्या. तर तीन म्हशी बिमार आहेत. यात त्यांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बाबाराव तेलरांधे यांची दोन जनावरे दगावली तर एक गाय बिमार आहे. तसेच तुलसीराम सावरकर, आनंद सावरकर विठोबा सावरकर, नानाजी लिल्हारे, आनंद सावरकर यासह अनेकांच्या गायी, बैल, म्हशी बिमार आहेत.
जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांनी स्थानिक पशुवैकीय विभागाला याची माहिती दिली. पण सुरुवातीला थातूरमातूर इलाज झाल्याने जनावरे बिमारच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जनावरे चारा खाणे सोडून देतात आणि एकाच दिवसात मल्हूल पडतात. दिसऱ्याच दिवशी ती मरतील अशीच स्थिती असते. त्यामुळे जनावरांवर एखाद्या रोगाचे सावट असावे असा संशय गावकरी व्यक्त करतात. तर पशुव्यद्यकीय चमू मात्र एखादी विषारी झाड या जनावरांच्या खाण्यात आल्याने त्यांना विषबाधा झाली असावी असे सांगत आहे. चारा जपून खाऊ घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे.
पशुवैद्यकीय केंद्र व्याऱ्यावर
मोर्चापूर हे गाव सुकळी स्टेशन येथील पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत येते. परंतु येथील केंद्रात अनेकदा अधिकारीच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. साध्या वस्तूही तेथे उपलब्ध नसतात. येथे असणारा पशुवैद्यकीय दवाखाण्याची इमारतही दुरवस्थेत आहे. दहा वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्याला बसण्यास जागा नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनीवरून गोपालकांना शोध घावा लागतो. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या इमारतीला जागोजागी भेगा पडल्या आहे.
मृत जनावरे तशीच शेतात
जनावरे लागोपाठ दगावल्याने त्यांना कुठे समाधी द्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे काही जनावरे तशीच पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

Web Title: Six animals have died in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.