सामूहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:33+5:30

पीडिता आपल्या पतीसह सावंगी (मेघे) येथे आली असता शेखर चंदनखेडे याने मुलाखतीच्या बहाण्याने सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. पतीला बाहेर थांबवून फार्महाऊस आधीच असलेल्या पाच जणांसह सर्वांनी आळीपाळीने अत्याचार करुन कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

Six accused arrested in mass atrocity case | सामूहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना अटक

सामूहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना अटक

Next
ठळक मुद्देमुलाखतीच्या बहाण्याने नेले फार्महाऊसवर : वाहनांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोकरीचे आमिष दाखवून मुलाखतीच्या बहाण्याने पीडितेला फार्महाऊसवर नेत हातपाय बांधून आळीपाळीने सहा आरोपींनी अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली होती. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.
शेखर सुरेश चंदनखेडे (२४) रा. पवनार, लोकेश उर्फ अभिजीत गजानन इंगोले (२४) रा. तुकाराम वॉर्ड, हेमराज बाबा भोयर (३९) रा. सिंदी (मेघे), नितीन मारोतराव चावरे (२७), राहुल बनराज गाडगे (२८) दोन्ही रा. खरांगणा, पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (२६) रा. सिंदी (मेघे) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेखर चंदनखेडे याने सिंदी (रेल्वे) येथील पीडितेला फोन करून नोकरीचे आमिष दाखवून सावंगी (मेघे) येथे बोलाविले. पीडिता आपल्या पतीसह सावंगी (मेघे) येथे आली असता शेखर चंदनखेडे याने मुलाखतीच्या बहाण्याने सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. पतीला बाहेर थांबवून फार्महाऊस आधीच असलेल्या पाच जणांसह सर्वांनी आळीपाळीने अत्याचार करुन कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेने बाहेर येवून सारा प्रकार पतीला सांगताच सावंगी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांच्या चमूने घटनास्थळ गाठून फार्महाऊसचा पंचनामा केला असता काही आक्षेपार्ह वस्तू तेथे मिळून आल्या. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सहाही आरोपींना अटक केली असून पीडितेला जिल्हा सामान्य रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

मुख्य आरोपी होता पीडितेच्या संपर्कात
घटनास्थळावर पहाटेपर्यंत पंचनामा करुन आरोपींचे कपडे, वाहन, मोबाईल आदींचा शोध घेतला. मुख्य आरोपी शेखर चंदनखेडे याने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवून मागील आठ दिवसांपासून तो तिच्या संपर्कात होता. शेखर पीडितेला वारंवार फोन करून नोकरीचे आमिष देत भेटण्यास बोलवित होता. शेखरला पवनार येथून अटक केली असून तो एका सावजी हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो.

आरोपींमध्ये डॉक्टरचा वाहनचालक
सामूहिक अत्याचार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमधील हेमराज भोयर हा शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टराच्या वाहनावरील चालक असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकेच नव्हेतर ज्या फार्महाऊसमध्ये घटना घडली ते त्याच डॉक्टरचे असल्याची माहिती आहे.

Web Title: Six accused arrested in mass atrocity case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.