शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, सिंहासने, छत्री आणि दानपेटीतील २ लाख रुपयांची रक्कमदेखील लंपास

By योगेश पांडे | Updated: February 28, 2025 21:37 IST

Nagpur Crime News: लोकांची घरेच नव्हे तर आता शहरात मंदिरेदेखील चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. ग्रेट नाग रोड, जुनी शुक्रवारी येथील श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरातून रात्रीच्या सुमारास चोरट्याने चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसेच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड लंपास केली.

- योगेश पांडे नागपूर - लोकांची घरेच नव्हे तर आता शहरात मंदिरेदेखील चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. ग्रेट नाग रोड, जुनी शुक्रवारी येथील श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरातून रात्रीच्या सुमारास चोरट्याने चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसेच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरात दररोज जैन भाविक पूजाअर्चनेसाठी येतात. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास टी शर्ट घातलेला एक चोरटा मंदिरात शिरला. त्याने मंदिरातील दानपेटीकडे रोख वळविला. त्याने मंदिरातून पाच चांदीच्या मूर्ती, १२ सिंहासने, एक चांदीची छत्री तसेच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड चोरली. चोरट्याने ५० रुपये किंवा त्याहून कमी किंमतीच्या नोटा न चोरता केवळ मोठ्या नोटांवरच हात मारला. त्यानंतर तो तेथून फरार झाला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती मंदिर व्यवस्थापनातील सदस्यांना देण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक मंदिरात पोहोचले. चोरीची ही बातमी जैन बांधवांमध्ये वेगाने पसरली. त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील भागातून चोरट्याने आत प्रवेश केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंदिरात शिरल्यानंतर आरोपीने मंदिरात पूर्ण पाहणी केली व त्यानंतर दानपेटी फोडून पैसे काढले, अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष राजकुमार जैन यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर