अंदोरी वळण रस्त्यावर बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST2019-11-08T06:00:00+5:302019-11-08T06:00:24+5:30
देवळी नजीकच्या अंदोरी वळणावरील परिसरात लहान मोठी पंधरा गावे असून यामध्ये आंजी, अंदोरी, गौळ, अडेगाव, वाटखेडा, गिरोली, राळेगाव आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून त्यांचा देवळीसोबत दररोजचा संपर्क असतो. परंतु देवळीच्या शिवारात प्रवेश करतानाच अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने या सर्व गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

अंदोरी वळण रस्त्यावर बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : दिलीप बिल्डकॉन तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या तुघलकी कारभारामुळे दोन दिवसापूर्वी अंदोरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात बीएसएफच्या माजी जवानाचा बळी गेला. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतत्प नागरिकांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या नेतृत्वात बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव करुन कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला.
देवळी नजीकच्या अंदोरी वळणावरील परिसरात लहान मोठी पंधरा गावे असून यामध्ये आंजी, अंदोरी, गौळ, अडेगाव, वाटखेडा, गिरोली, राळेगाव आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून त्यांचा देवळीसोबत दररोजचा संपर्क असतो. परंतु देवळीच्या शिवारात प्रवेश करतानाच अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने या सर्व गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. महामार्ग प्रशासनाने बांधकामादरम्यान राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करुनही महामार्ग प्रशासन व कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताची मालिका सुरुच राहिली. दोन दिवसापूर्वी माजी जवान संजय कुळसुंगे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त करून मोटारवाहनांची तोडफोड केली. तसेच गुरुवारी बिल्डकॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालून अंदोरी वळणाचे डाव्या बाजूला चारपदरी महामार्गाचे डिव्हायडर तोडून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मिडल ओपनिंग करणे, ब्लिकींग लाईट लावणे, अंदोरी रस्ता वळणावर गतिरोधक तयार करणे तसेच महामार्गाच्या नियमानुसार जंक्शन टॉवर बोर्डाची व्यवस्था करण्यासोबतच वळणावर सेप्टीगार्ड तयार करण्याची मागणी करण्यात आली. देवळीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर व नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांच्या मध्यस्थीने येत्या तीन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्याची हमी बिल्डकॉनच्या अधिकाºयांनी दिल्याने नागरिकांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. तीन दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामध्ये राजेश बकाने, बंडू जोशी, जब्बार तंवर, दिलीप कारोटकर, संजय कामडी, संतोष भोयर, गजानन डोंगरे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.