गरम कपड्यांच्या बाजारात शुकशुकाट

By Admin | Updated: January 6, 2016 02:47 IST2016-01-06T02:47:52+5:302016-01-06T02:47:52+5:30

गत पंधरवड्यात दोन ते तीन दिवस थंडीची लाट पसरली होती. त्यामुळे आणखी काही दिवस थंडीचा भर कायम राहील असा अंदाज होता.

Shukushkat in the hot clothes market | गरम कपड्यांच्या बाजारात शुकशुकाट

गरम कपड्यांच्या बाजारात शुकशुकाट

गारठाच नसल्याने ग्राहकांची खरेदीकडे पाठ
वर्धा : गत पंधरवड्यात दोन ते तीन दिवस थंडीची लाट पसरली होती. त्यामुळे आणखी काही दिवस थंडीचा भर कायम राहील असा अंदाज होता. पण तीनच दिवसात थंडीचा भर ओसरला. त्यामुळे गारठाच नसल्याने ंगरम कपड्याचा बाजारात शुकशुकाट पसरला आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात थंडीची लाट पसरते. रबीचा हंगामही सुरू असल्याने थंडीची आवश्यकता असते. गारठा वाढताच सर्वांनी पावले उनी कपड्यांच्या खरेदीकरिता गरम कपड्यांच्या बाजाराकडे वळतात. उनी कपडे विकण्यासाठी शहरात तिब्बती शरणार्थी व्यावसायिक मोठ्या संख्येने येत असतात. शहरातील जुन्या नगर परिषद परिसरात त्यांनी दुकाने थाटली आहेत. सोबतच इतरत्र किरकोळ दुकाने थाटून कपड्यांची विक्री सुरू आहे. पण या वर्षी थंडीची लाटच नसल्याने नवे कपडे घेण्याचा उत्साह नागरिकांत दिसत नाही. परिणामी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. केवळ लहान मुलांसाठी उनी कपडे खरेदी करण्याची तेवढी लगबग सुरू आहे.
जानेवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. आणखी पंधरा दिवसांनी संक्रांत सण आहे. हा सण म्हणजे थंडी ओसरून उन्हाळ्याला सुरुवात असते. आणि या काही दिवसात गारठा वाढेल याची शक्यता नाही. त्यामुळे या वर्षी व्यवसायच झाला नसल्याने तिब्बती विक्रेते सांगत आहेत.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Shukushkat in the hot clothes market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.