शुभांगी मृत्यू प्रकरण दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:33 IST2018-04-14T22:33:08+5:302018-04-14T22:33:08+5:30

सेलू तालुक्यातील दहेगाव (तुळजापूर) रेल्वे स्टेशन जवळील धपकी शिवारात शुभांगी उईके हिचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांकडून करण्यात आला.

Shubhangi death case in Delhi | शुभांगी मृत्यू प्रकरण दिल्लीत

शुभांगी मृत्यू प्रकरण दिल्लीत

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्य मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील दहेगाव (तुळजापूर) रेल्वे स्टेशन जवळील धपकी शिवारात शुभांगी उईके हिचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांकडून करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी सोपविण्यात यावा अशी मागणी स्थानिक प्रशासनाला करण्यात आले. मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आदिवासी नेते अवचित सयाम यांनी चंद्रपूर गाठत केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली.
शुभांगी उइके मृत्यू प्रकरणात पोलिसांचा तपास आत्महत्याच्याच दिशेने तपास सुरू आहे. आलटून पालटून पोलीस प्रशासन त्याच दिशेने जात असल्याचा आरोप सयाम यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून योग्य दिशेने तपास होईल अथवा नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता वर्धेतील तब्बल ४८ संघटनांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणाचा तपास योग्य रित्या करण्याचे आश्वासन दिले. मात्र यात काहीच घडत नसल्याचे दिसत असल्याचा आरोप सयाम यांनी निवेदनातून केला आहे.
या मृत्यू प्रकरणात अनेक बाबी डोळ्यासमोर असताना त्याकडे तपासी यंत्रणेचे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बाबी पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप आहे.
पोलिसांचे श्वान तब्बल दोन वेळा या परिसरातील एका सागाच्या झाडाखाली घुटमळले. येथून परत दहेगावच्या दिशेने अंदाजे ५०० फुट जातो. असे असताना त्या दिशेने पोलिसांचा तपास होत नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्न निर्माण झाला आहे. तिचा मृतदेह आढळला ते ठिकाण आणि सागाचे झाड यात खुप अंतर आहे. त्यामुळे या सागाच्या झाडाचा आणि शुभांगीच्या मृत्यूचा काही संबंध आहे काय, याचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या झाडाच्या लगत असलेल्या शेतमालकांचे बयाण पोलीस नोंदवित नाही. मरणाच्या वेळेत व ज्या शेतकऱ्यांनी तिला पाहिले त्या दोन्ही वेळेत खुप अंतर आहे.
पोलिसांच्या मते तिने आत्महत्या केली. मग तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पोलिसांनी घटनेच्या पूर्वी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींचे रितसर बयाण नोंदविले नाही. तिच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पांढºया ओढणीचे रहस्य कायमच आहे. असे असताना पोलिसांनी सर्व पुरावे दुर्लक्षित करून शुभांगीची हत्या नाही तर आत्महत्याच ठरवू असे ठरविल्याचे या होत असलेल्या प्रकारावरून दिसत आहे. यामुळे पोलीस यंत्रणेला या प्रकरणात खरा तपास करण्याच्या सूचना करण्याची मागणी अवचित सयाम यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या केली .
निवेदन देताना प्राचार्य शांताराम उईके, प्रा. धिरज सेडमाके, रमेश कुमरे, प्रशांत गावडे, सारंग कुमरे आदी उपस्थित होते.

Web Title: Shubhangi death case in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.