शिरपूरला वादळाचा तडाखा

By Admin | Updated: June 3, 2017 00:31 IST2017-06-03T00:31:15+5:302017-06-03T00:31:15+5:30

तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच थैमान घातला. यात वर्धमनेरी शिवारात विज कोसळून दोन जण ठार झाले

Shrapur storm hits | शिरपूरला वादळाचा तडाखा

शिरपूरला वादळाचा तडाखा

अनेक घरांवरील छप्पर उडाले : वर्धमनेरी शिवारात वीज कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच थैमान घातला. यात वर्धमनेरी शिवारात विज कोसळून दोन जण ठार झाले तर पावसासह आलेल्या वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील छप्पर उडले. तर येथे नव्याने तयार होत असलेल्या केळीच्या बागांचेही नुकसान झाले. हे वादळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आले.
सायंकाळी आलेल्या वादळात शिरपूर येथील राजू भोंगाडे यांच्या घराचे छप्पर, देविदास शिरपूरकर यांचा गोठा तर राजू चांडक यांचे घराचे टिनाचे शेड उडाल्याची माहिती मिळाली. या वादळामुळे रस्त्यांवरील अनेक वृक्ष उन्मळून पडले. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या सोसाट्याच्या वाऱ्याने केळी बागांचे नुकसान झाले. मात्र बातमी लिहेपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे कळू शकली नाही. या वादळ पावसाने गावातील व परिसरातील विज प्रवाह खंडित झाला होता. राद्धी उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. यामुळे रात्र अंधरात काढण्याची वेळ गावकऱ्यांवर येणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. या वादळाचा तडाखा बसलेल्यांना शासकीय मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Shrapur storm hits