जलजागृतीसाठी ग्रामस्थांचे श्रमदान
By Admin | Updated: April 12, 2017 00:27 IST2017-04-12T00:27:51+5:302017-04-12T00:27:51+5:30
रमदानातून पाणी वाचवा या स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांत जलजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.

जलजागृतीसाठी ग्रामस्थांचे श्रमदान
जिल्हाधिकाऱ्यांची भेट : गावातून प्रभात फेरी
रोहणा : श्रमदानातून पाणी वाचवा या स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांत जलजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांनीही सहभागी होत श्रमदान केले.
प्रभातफेरीत गावातील शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. फेरीत विविध कारणाद्वारे पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा आवश्यक व योग्य वापर याबाबत जागृती करण्यात आली. दरम्यान, गावाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी धावती भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांना माती बंधारे, सिमेंट बंधारे व शोष खड्डे ही कामे श्रमदानातून करण्याचा सल्ला दिला. या उपक्रमात सरपंच सुनील वाघ, उपसरपंच शेख अब्बास शेख जमील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव घोटकर, विविध विभागातील शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सरपंचांनी श्रमदानाला लवकरच सुरूवात करीत असल्याचे सांगितले. या जलजागृती कार्यक्रमात ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले.(वार्ताहर)