शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील ३२ पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

वर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कामकाज सांभाळताना पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांची नेहमीच तक्रार घेवून आलेल्या प्रत्येकाची बाजू जाणून घेतली. लॅाकडाऊन अन् कोरोना संकटाच्या काळात त्यांनी शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात करून घेतली. सण आणि उत्सवांदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी यांची बैठक घेवून आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या.

ठळक मुद्देएसपींचा आदेश : वर्धा शहराची जबाबदारी सांभाळणार बंडीवार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ३२ पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या आदेशानुसार बदली करण्यात आली आहे. वर्धा शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांची गोंदीया येथे बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागी हिंगणघाटचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगणघाट सारख्या शहरातील गुन्हेगारीला नियंत्रणात ठेवणारे पोलीस निरीक्षक बंडीवार आता वर्धा शहराची जबाबदारी स्विकारणार आहेत.प्राप्त माहितीनुसार, पोलीस अधिकारी सत्यवीर बंडीवार यांची वर्धा शहर,  आर्वीचे ठाणेदार संपत चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखा वर्धा, कारंजाचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांची वडनेर पोलीस स्टेशन, वाचक शाखेतील राजेंद्र कडू यांची वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेतील अशोक चैाधरी यांची जिल्हा विशेष शाखा, अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले यांची दहेगाव पोलीस स्टेशन, खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांची आर्वी पोलीस स्टेशन, दहेगाव पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांची खरांगणा पोलीस स्टेशन, पो.स्टे. तळेगाव येथील पोलीस निरीक्षक रवी राठोड यांची पोलीस कल्याण शाखा व दोषसिद्ध कक्ष, पो.स्टे. वडनेर येथील पोलीस निरीक्षक आशीष गजभिये यांची तळेगाव पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. तर पुलगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी सपना निरंजने यांची सेलू पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन मधील निर्मला किन्नाके यांची वर्धा शहर पोलीस स्टेशन, जि.वि.शा.वर्धा येथील पोलीस अधिकारी सुनील दहिभाते यांची पो. अधीक्षकांचे वाचक,  सेलू पोलीस ठाण्यातील सैारभ घरडे यांची स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, आर्वी पोलीस ठाण्यातील गोपाल ढाले यांची  स्था.गु. शाखेच्या सायबर सेल, वडनेर पोलीस ठाण्यातील सचिन मानकर यांची कारंजा पोलीस स्टेशन, समुद्रपूर पोलीस स्टेशन मधील मयुरी गायकवाड यांची हिंगणघाट पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन येथील गजानन कंगाले यांची सेलू पोलीस स्टेशन, पोलीस नियंत्रण कक्षातील जोगेश्वर मिश्रा यांची पीआरओ कक्ष, पो.स्टे. आर्वी येथील कविता फुसे यांची कारंजा पोलीस स्टेशन, वडनेर पोलीस स्टेशन येथील अपेक्षा मेश्राम यांची समुद्रपूर पोलीस ठाण्यात, खरांगणा पोलीस स्टेशन येथील हुसेन शहा यांची तळेगाव पोलीस स्टेशन, पो.स्टे. समुद्रपूर येथील दीपेश ठाकरे यांची हिंगणघाट पोलीस ठाण्यात, रामनगर पोलीस ठाण्यातील महेश ईटकल यांची सावंगी पोलीस ठाण्यात, सेलू पोलीस स्टेशन मधील पुंडलिक गावडे यांची रामनगर पोलीस स्टेशन, सावंगी पो.स्टे.तील गणेश सायकर यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात, कारंजा पोलीस ठाण्यातील योगेश चाहेर यांची आर्वी पोलीस स्टेशन, आष्टी पोलीस स्टेशन येथील देवानंद केकन यांची आर्वी पोलीस स्टेशन, हिंगणघाट पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी रामदास खोत यांची समुद्रपूर पोलीस स्टेशन, पोलीस अधिकारी चेतन बोरखेडे यांची वर्धा शहर पोलीस स्टेशन, पुलगाव पोलीस स्टेशन येथील पवन भांबूरकर यांची खरांगणा पोलीस स्टेशन, पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस अधिकारी भानूदास पिदुरकर यांची पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे बदली करण्यात आली आहे. ते अधिकारी लवकरच नियुक्ती करण्यात आलेल्या ठिकाणी रुजू होणार आहेत.

योगेश पारधींचा कार्यकाळ राहिला उत्तमवर्धा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कामकाज सांभाळताना पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांची नेहमीच तक्रार घेवून आलेल्या प्रत्येकाची बाजू जाणून घेतली. लॅाकडाऊन अन् कोरोना संकटाच्या काळात त्यांनी शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात करून घेतली. सण आणि उत्सवांदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी यांची बैठक घेवून आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून त्यांच्या सहकाऱ्यांनाही शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार मुरलीधर बुराडे यांच्या कार्यप्रणालीची आठवण होत होती, हे विशेष. मुरलीधर बुराडे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा कार्यकाळ उत्तम राहिला हेाता.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली