शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वर्ध्यात गतिमंद तरुणीवर अत्याचार; नराधमास अटक

By चैतन्य जोशी | Updated: September 6, 2022 14:15 IST

पोरगव्हाण गावातील घटनेने खळबळ

वर्धा : घरात कुणी नसल्याचा फायदा घेत नराधम युवकाने गतिमंद तरुणीवर बळजबरी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना पोरगव्हाण गावात घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आष्टी पोलिसांंनी आरोपी नराधमास ५ रोजी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव अतुल सुरेश बोरीवार (२५) असे आहे.

२५ वर्षीय गतिमंद तरुणीचे आई-वडिल शेतात मजुरी काम करण्यास गेले होते. पीडितेचा भाऊ आणि पीडिता हे दोघेच घरी होते. पीडितेचा भाऊ जेवण करुन घरासमोरीलच चौकात मित्रांसोबत गप्पा करण्यासाठी गेला होता. काही वेळाने पीडितेचा भाऊ घरी गेला असता पीडिता ही नग्न अवस्थेत दिसून आली. तसेच आरोपी नराधम अतुल हा देखील तेथे दिसून आला. पीडितेच्या भावाला पाहून आरोपीने तेथून पळ काढला. पीडितेच्या भावाने याबाबतची तक्रार आष्टी पोलिसात दिली. पोलिसांनी ५ रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अतुल सुरेश बोरीवार याला अटक केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगwardha-acवर्धा