शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

कर्जमाफीसाठी शिवसेना न्यायालयीन लढाई लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:19 AM

कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होऊनही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नावे असतानासुद्धा बँक हेतुपुरस्पर लाभापासून वंचित ठेवतात. बोंडअळी असो की नाफेडच्या तूर खरेदीच्या जमा झालेल्या रकमेची प्रकरणे असो,........

ठळक मुद्देअनंत गुढे : अल्लीपुरात शिवसेनेचा शेतकरी सन्मान मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होऊनही अद्याप शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या यादीत नावे असतानासुद्धा बँक हेतुपुरस्पर लाभापासून वंचित ठेवतात. बोंडअळी असो की नाफेडच्या तूर खरेदीच्या जमा झालेल्या रकमेची प्रकरणे असो, यात सदैव शेतकऱ्यांचीच फसवणूक झाली आहे. या निगरगट्ट सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीची प्रकरणे घेऊन थेट न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन वर्धा लोकसभा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांनी केले.शिवसेनेच्या अल्लीपूर शाखेच्या वतीने गुरुवारी येथे संताजी सभागृहात शेतकरी सन्मान मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी गुढे बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना उपनेते अशोक शिंदे, शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, युवासेना अचलपूर जिल्हाधिकारी प्रकाश मारोटकर, उपजिल्हाप्रमुख भारत चौधरी, अनंता देशमुख, पंचायत समिती सदस्य अमोल गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटीका पुष्पा काळे यांची उपस्थिती होती.शेतकऱ्याविषयी न्यायीक भूमिका असली पाहिजे व महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा न करण्याच्या अटीवर आजपर्यंत शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. पण सरकारने शेतकऱ्यांनाच रडविण्याचा सपाटा सुरू केला. म्हणून आता शिवसेना रस्त्यांवर उतरून आंदोलनात्मक भूमिका स्वीकारत आहे. या जनआंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपनेते अशोक शिंदे यांनी केले.शैलेश अग्रवाल यांनी शासनाच्या योजना कशा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आहेत, याबाबत पुराव्यानिधी शेतकऱ्यांपुढे सिद्ध केले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेश सराफ, बाळा शहार्गडकर यांनीही विचार मांडले. संचालन प्रवीण कात्रे यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनाकरिता पंकज खोडे, गोपाल मेघरे, मारोतराव भोयर, गजानन चिंचोळकर, शेखर पाटील बिडवाईक, चंदू तडस, दिलीप धुसे, शंकर जोगे, मारोती सुरकार, किसना साखरकर, रामचंद्र बाळबुधे, अशोक सुरकार, राजू वाघमारे, कृष्णा लोणारे, दिलीप भोमले, शंकर भायर, सुधाकर सेलकर, प्रितम वरघणे, किशोर सेलकर, सुधीर चाफले, श्रीधर झाडे यांनी सहकार्य केले.सेना नेत्यांची शेतकऱ्यांसह बॅकेवर धडकमेळाव्यात कर्जमाफीच्या प्रकरणांसदर्भात संपूर्ण कागदपत्रे जोडलेले अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात आले. यातील काही प्रकरणांना घेऊन शिवसेना पदाधिकाºयांनी थेट भारतीय स्टेट बँकेची अल्लीपूर शाखाच गाठली. बँक व्यवस्थापक साठवणे यांच्याशी संबंधीत प्रकरणाबाबत चर्चा केली असता बरीच प्रकरणे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतानाही बँकेकडून असहकार्याची मानसिकता दिसून आली. तर सोनेगाव येथील शेतकरी भास्कर खुनकर यांची बँकेने दोन महिन्यांपासून अडवून ठेवलेली नाफेडच्या तूर चुकाऱ्याची ७५ हजारांची रक्कम त्यांना त्वरीत देण्यात आली. बॅकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Anant Gudheअनंत गुढेShiv Senaशिवसेना