पर्जन्यमापक यंत्र ठरतेय शोभेचे
By Admin | Updated: July 12, 2014 23:49 IST2014-07-12T23:49:45+5:302014-07-12T23:49:45+5:30
पावसाळ्यात पाऊस मोजता यावा म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे; पण हे यंत्र सध्या नुसताच खाली डबा झाले आहे़ यामुळे पावसाची नोंद कशी होते,

पर्जन्यमापक यंत्र ठरतेय शोभेचे
कारंजा (घा़) : पावसाळ्यात पाऊस मोजता यावा म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारात पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे; पण हे यंत्र सध्या नुसताच खाली डबा झाले आहे़ यामुळे पावसाची नोंद कशी होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ यामुळे पर्जन्यमापक यंत्र शोभेचेच ठरले आहे़
नापिकी, कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, गारपीट यामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एक ना अनेक समस्यांनी ते त्रस्त आहेत़ अशावेळी आपल्या खऱ्या समस्या शासनापर्यंत तहसील कार्यालयामार्फत वरिष्ठांना कळाव्या, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. तालुक्यात किती पाऊस झाला, याची नोंद करण्यासाठी कारंजा तहसील कार्यालयाच्या आवारात पाऊस मोजण्याचे यंत्र दिमाखात लावण्यात आले आहे. या माध्यमातून तालुक्यात किती पाऊस झाला, याची बरोबर आकडेवारी वरिष्ठांना कळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; पण सध्या येथील पर्जन्यमापक यंत्र नुसताच खाली डबा असल्याचे निदर्शनास येत आहे. केवळ डबा शिल्लक राहिल्याने यात तालुक्याचे पर्जन्यमान माजेले जाते काय व तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला जातो काय, हा प्रश्नच आहे़ या आवारात दोन यंत्र लावले आहेत़ दोन्ही यंत्रे रिकामे आहे़ एकात-एक कॅडबेरीची रिकामी बरणी ठेवली आहे त्याद्वारे तालुक्यात किती पाऊस झाला, हे सांगितले जाते़ पावसाची नोंद घेण्याकरिता कुणीही जबाबदार अधिकारी नाही़ चौकीदारांकरवी ती नोंद करून घेतली जाते़
येथील तहसील कार्यालयास मद्याची सवय जडल्याचे दिसते़ कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या नागरिकांद्वारे तसा अनुभव येत असल्याचे सांगितले जाते़ नवीन इमारतीच्या मागील बाजूस देशी-विदेशी दारुच्या बाटल्या फेकलेल्या आढळून आल्यात़
गुरूवारी कारंजा तहसीलच्या नवीन इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा व बैठक घेतली़ शिवाय तालुक्यात भेटी होत्या़ यासाठी कार्यालयाच्या मोठ्या सभागृहात व्यवस्था करण्यात आली होती़ बैठक संपताच पंखे, लाईट बंद करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ रिकाम्या खुर्च्यांना दिवे प्रकाश तर पंखे हवा देत होते़ जिल्हाधिकाऱ्यांची वरवर करण्यात येथील अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने हा प्रकार घडला असावा, असे दिसते़(शहर प्रतिनिधी)