पिंपळा पुनर्वसन येथील जवान शेखर बाळस्कर बेपत्ता
By Admin | Updated: June 2, 2016 00:33 IST2016-06-02T00:33:32+5:302016-06-02T00:33:32+5:30
पुलगाव येथील दारूगोठा भांडारात झालेल्या बॉम्बस्फोटात तालुक्यातील पिंपळा पुनर्वसन येथील शेखर गंगाधर बाळस्कर शहीद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपळा पुनर्वसन येथील जवान शेखर बाळस्कर बेपत्ता
शहीद झाल्याची भीती : ओळख पटविण्याचे प्रयत्न
सुरेंद्र डाफ आर्वी)
पुलगाव येथील दारूगोठा भांडारात झालेल्या बॉम्बस्फोटात तालुक्यातील पिंपळा पुनर्वसन येथील शेखर गंगाधर बाळस्कर शहीद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पुलगाव दारुगोळा भांडारात झालेल्या घटनेच्यावेळी कर्तव्यावर होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. स्फोटात तो शहीद झाल्याचा दाट संशय आहे. मात्र काही मृतदेहांची स्थिती बिकट असल्यामुळे शेखरची ओळख पटलेली नाही.
पुलगाव दारूगोळा भांडार प्रशासनाने काही मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शेखरचे वडील व लहान भाऊ सेवाग्राम येथे गेले होते.
तिथे शेखरच्या वडिलांचा डीएनए शेखरच्या मृतदेहाशी जुळवून पाहणार आहे.
या घटनेने ९०० लोकवस्ती असलेल्या पिंपळा पुनर्वसन येथील वातावरण शोकाकूल आहे.
शेखरचा परिचय
शेखरचे पूर्ण नाव शेखर गंगाधर बाळस्कर असून तो आर्वी तालुक्यातील पिंपळा पुनर्वसन येथील रहिवासी आहे. तो पुलगाव येथील डेपोत १३ महिन्यांपूर्वी फायरमन या अग्निशमन दलात नोकरीवर रूजू झाला. त्याचे वय २७ वर्षाचे असून तो अविवाहित आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील मजूरीचे काम करतात. एक लहान भाऊ गोविंदा बाळस्कर हा सिंचन विभाग यवतमाळ येथे कार्यरत आहे. दुसरा लहान भाऊ अरविंद वर्धा येथे बी.ई.चे शिक्षण घेत आहे.
तो या स्फोटात शहीद झाल्याची वार्ता पिंपळा पुनर्वसन गावात आहे. मात्र हा मृतदेह माझ्या भावाचा नाही, असे त्याच्या लहान भावाने म्हटल्याने व मृतदेह ओहख पटण्याजोगा नसल्याने वडीलांच्या डी.एन.ए. टेस्टवरून तो मृतदेह शेखरचा आहे याची खात्री करणार आहे. यासाठी शेखरचा मृतदेह सेवाग्राम येथे नेण्यात आला आहे. ओळख पटल्यावर याची खात्री होणार असल्याची माहिती आहे.