शेगाव-करुळ रस्त्याची झाली दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:37 IST2018-01-24T00:33:34+5:302018-01-24T00:37:08+5:30

शेगाव-करुळ रस्त्याची झाली दैना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदोरी : शेगाव (गो) ते करुळ या ३ किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करीत नियोजित ठिकाण गाठावे लागत आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे एकाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी आहे.
सदर मार्ग ३ किमीचा असून त्यापैकी सुमारे दीड किमीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. इतकेच नव्हे तर रस्त्यावरील गिट्टीही उखडली आहे. गत वर्षी या मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. परंतु, त्यावेळी झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करावा लागत असून नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.