शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते ‘जेल’ची हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगलेलेच बरे, अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.  नागरिकांनी लाईक, शेअर, फॉरवर्ड जपून करण्याची गरज असल्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राजकीय वादात कारण नसताना गुन्हा घडेल, या पद्धतीने मतप्रदर्शन करणे, एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील, अशा पद्धतीने मेसेज पोस्ट करणे, एखाद्या तरुण, तरुणीची बदनामी करण्यासाठी फेक प्राेफाईल बनविणे, असे सर्व प्रकार फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रती असलेले अज्ञान आणि आततायीपणा सायबर गुन्हेगारीला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असून सायबर सेलकडे तक्रारी येत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगलेलेच बरे, अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.  नागरिकांनी लाईक, शेअर, फॉरवर्ड जपून करण्याची गरज असल्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.  सध्या सायबर भामटे  सक्रीय झाले असून विविध प्रकारे गंडविण्याचे नवनवे फंडे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या मेल्स तसेच लिंकपासूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून nसोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सावधानता बाळगून वापर करण्याची गरज आहे.  फेक बॅंकिंग ॲप, फेक वेबसाईट, नायजेरियन फ्राॅड, फेसबुक फ्राॅड, क्लोनिंग, आयडेंटिटी चोरी, हनी ट्रॅप,  अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मुलींनो, डीपी सांभाळाnमुलींनी फेसबुकवर स्वत:चे प्रोफाईल फोटो ठेवू नये, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच प्राेफाईल लॉक करून ठेवावी. तसेच व्हॉट्सॲपवर डीपी ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा. जेणेकरून कुणीही आपला प्राेफाईल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सोशल मीडियावर बदनामी; ८ जणांवर गुन्हे - सायबर सेलकडे जिल्ह्यातील आठ ते दहा तक्रारींचा समावेश असून पोलिसांनी त्यांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कांबळे हे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर वॉच ठेवून आहेत. 

भावनांवर घालावा आवर - सामाजिक माध्यमांवर व्यक्त होण्यापूर्वी  आपण करतोय ते योग्य आहे का, याची खातरजमा करूनच खरं व्यक्त झाले पाहिजे. आपल्या एखाद्या पोस्टमुळे वादंग होणार असेल तर अशा प्रकारे व्यक्त न झालेलेच योग्य राहील. भावनांना आवर घातला पाहिजे. राजकीय चिखलफेकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी न होणे केव्हाही चांगले.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक