शरद देशमुख आज बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा देणार?

By Admin | Updated: May 26, 2016 00:26 IST2016-05-26T00:26:32+5:302016-05-26T00:26:32+5:30

येथील बाजार समितीतील गौंडबंगालप्रकरणी विरोधकांचे लक्ष्य ठरलेले शरद देशमुख गुरुवारी जिल्हा उपनिबंधकाकडे वर्धा कृषी उत्पन्न बाजार ....

Sharad Deshmukh to resign as chairman of the market committee? | शरद देशमुख आज बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा देणार?

शरद देशमुख आज बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा देणार?

वर्धा : येथील बाजार समितीतील गौंडबंगालप्रकरणी विरोधकांचे लक्ष्य ठरलेले शरद देशमुख गुरुवारी जिल्हा उपनिबंधकाकडे वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा देणार असल्याची असल्याची विश्वसनीय माहिती आहे. याबाबत शरद देशमुख यांच्याशी संपर्क न झाल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.
वर्धा बाजार समितीमध्ये झालेल्या कथित अफरातफर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. यामध्ये मागील काही वर्षांपासून सभापती पदावर असलेले शरद देशमुख यांना लक्ष्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर बाजार समितीच्या १५ संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारीत करून तो जिल्हा उपनिबंधकांकडे सादरही करण्यात आला आहे.
तसेच सदर प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी देशमुख यांना सुनावणीत १० दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी म्हणजे गुरुवारी शरद देशमुख सभापतिपदाचा राजीनाचा देणार, अशी चर्चा बाजार समितीच्या गोटातून ऐकायला मिळाली. ते खरंच राजीनामा देणार वा नाही हे गुरुवारी कळतील. याकडे बाजार समिती संचालकांचे लक्ष लागलेले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Sharad Deshmukh to resign as chairman of the market committee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.