शैलेश नवाल नवे जिल्हाधिकारी म्हणून रूजू
By Admin | Updated: May 17, 2016 01:50 IST2016-05-17T01:50:27+5:302016-05-17T01:50:27+5:30
वर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. शैलेश

शैलेश नवाल नवे जिल्हाधिकारी म्हणून रूजू
रूजू होताच सेवाग्राम आश्रमाला भेट
वर्धा : वर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवाल यांनी आशुतोष सलिल यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. शैलेश नवाल यापुर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
शैलेश नवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१० बॅचचे अधिकारी असून त्यांनी महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रशासकीय सेवेला सुरुवात केली आहे. डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी कारभार सांभाळला आहे. नवाल हे दिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असून त्यांनी एम.ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी प्रथम श्रेणी उत्तीर्ण केली आहे.(प्रतिनिधी)
बापूकुटी प्रेरणा देणारे स्थळ
४जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर शैलेश नवाल यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देत सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव उपस्थित होते. महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेला सेवाग्राम आश्रम प्रेरणा देणारे स्थळ असून जिल्ह्यातल्या सामाजिक आणि सर्वांगिण विकासासाठी कार्य करणार असल्याचे नवाल यांनी सेवाग्राम आश्रम भेटी प्रसंगी सांगितले. प्रारंभी आश्रम प्रतिष्ठानचे सचिव डॉ. श्रीराम जाधव यांनी सुतमाला व पुस्तक भेट देऊन स्वागत केले.