लग्नाचे आमिष देत मुलीचे लैंगिक शोषण
By Admin | Updated: December 23, 2015 02:44 IST2015-12-23T02:44:00+5:302015-12-23T02:44:00+5:30
येथील सालासार जिनिंगमध्ये मजुरीचे काम करीत असलेल्या एका मुलीवर त्याच जिनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने लग्नाचे आमिष देत ...

लग्नाचे आमिष देत मुलीचे लैंगिक शोषण
युवकाला वाशिम येथे अटक
हिंगणघाट : येथील सालासार जिनिंगमध्ये मजुरीचे काम करीत असलेल्या एका मुलीवर त्याच जिनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निरज राठोड (२४) रा. वाशिम याच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती निरज याला मिळताच तो पसार झाला. सदर युवक वाशिम येथे असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच त्यांनी वाशिम पोलिसांना माहिती देत सदर युवकाला वाशिम येथे अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, येथील जिनिंग प्रेसिंगमध्ये काम करण्यासाठी ही मुलगी आपल्या आई-वडिलांसह चंद्रपूर जिल्ह्यातून आली होती. आरोपी निरज राठोड हा सुद्धा त्याच जिनमध्ये काम करीत होता. दरम्यान या दोघांमध्ये ओळख झाली. या ओळखीतून निरजने सदर मुलीसोबत पे्रमसंबंध निर्माण केले व लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण केले. तिने निरज याला लग्नाची मागणी केली असता त्याच्याकडून विरोध झाला.
यामुळे आपली फसगत झाल्याचे सदर मुलीच्या लक्षात येताच तीने झालेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी हिंगणघाट पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय नाईक करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)