विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: February 26, 2016 02:34 IST2016-02-26T02:34:39+5:302016-02-26T02:34:39+5:30

शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका...

Sexual harassment of the girl | विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

डॉक्टरवर गुन्हा दाखल : पीडिता वैद्यकीय अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी
वर्धा : शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका प्राध्यापकावर पीडिताच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी रात्री उघड झाली असून यातील आरोपी प्राध्यापक अद्याप फरार असून त्याचे नाव डॉ. गजानन लक्ष्मणराव पिसुळकर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. याला विद्यार्थिनीने नकार दिल्यावरून प्राध्यापकाने तुझे शैक्षणिक नुकसान करेल, अशी धमकावणी दिली. या धमकावणीला बळी पडत विद्यार्थिनीने त्याची मागणी मान्य केली. विद्यार्थिनीला सावंगी परिसरातील हॅपी टॉवर येथे बोलावून तिचे सतत लैंगिक शोषण केले. अखेर कंटाळून सदर विद्यार्थिनीने सावंगी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. गजानन पिसुळकर याच्यावर भादंविच्या कलम ३७६ (२) (फ) (न) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी नागपूर येथे असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला असता त्यांना आरोपी मिळून आला नसल्याची माहिती आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

अश्लील चित्रफीत बनवून युवतीचे लैंगिक शोेषण

वर्धा- युवतीची अश्लील चित्रफीत बनवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना देवळी तालुक्यातील भिडी येथे उघड झाली. याप्रकरणी देवळी पोलिसात अल्पवयीन युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भिडी येथील एका अल्पवयीन मुलीची आकाश पानसिंग राठोड रा. भिडी याची ओळख झाली. यात त्याने युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने नकार दिला. त्यामुळे आकाशने संधी साधून तिची अश्लील चित्रफीत तयार केली. तसेच ही चित्रफीत व्हायरल करण्याची धमकावणी देऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. गत १६ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर पीडिताने गुरुवारी याबाबत तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आकाशवर भादंविच्या कलम ३७६ तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत कलम ३, १२ व लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sexual harassment of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.