शांती व अहिंसेचा संदेश देणारे सेवाग्राम आश्रम ८० वर्षांचे

By Admin | Updated: April 30, 2016 02:21 IST2016-04-30T02:21:43+5:302016-04-30T02:21:43+5:30

जागतिक किर्तीच्या सेवाग्राम येथील बापूकुटी ८० वर्षांची होत आहे. शांती आणि अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने ....

Seventh-year-old ashram, 80 years old, who gives message of peace and non-violence | शांती व अहिंसेचा संदेश देणारे सेवाग्राम आश्रम ८० वर्षांचे

शांती व अहिंसेचा संदेश देणारे सेवाग्राम आश्रम ८० वर्षांचे

पर्यटकांत आकर्षण कायमच : गांधी विचारांचा अविरत प्रवाह
सेवाग्राम : जागतिक किर्तीच्या सेवाग्राम येथील बापूकुटी ८० वर्षांची होत आहे. शांती आणि अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या कुटीतून अनेकजण उर्जा घेण्याकरिता येतात. बापुंच्या विचारातून प्रेरणा घेत आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याची येथील प्रथा आजही कायम आहे.
देशात अराजकता पसरली आहे. यातून आपले रक्षण करण्याकरिता आणि सर्वत्र शांतता राखण्याकरिता बापूंच्या शांती आणि अहिंसेच्या तत्त्वाची गरज असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. त्यांच्या याच तत्त्वाची शिदोरी या सेवाग्राम येथील आश्रमातून आजही देण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हीच शिदोरी आपल्या जीवनाचे खरे सार्थ असल्याचे म्हणत देश-विदेशातील पर्यटक या आश्रमात येत आहेत. महात्मा गांधी आपल्याला कळावे याकरिता त्यांच्या साध्या राहणीमानाचे आणि त्यांच्या विचाराची माहिती घेताना सतत दिसतात.
देशात राज्य करणारा असो वा राज्यकर्त्यांचा विरोधक असो, मोठा अभ्यासक असो वा पद्भूषण मिळविणारा मोठा ज्ञानी असो साऱ्यांना या आश्रमात सारखीच वागणूक दिली जाते. यातून बापूंचा समतेचा संदेश आश्रमातून अविरत देण्याचे काम सुरू आहे. महात्मा गांधीच्या या आश्रमाला आज ८० वर्षांचा कालावधी होत आहे. या काळात आश्रमाची प्रतिमा डागाळणाऱ्या काही घटना घडल्या. मात्र त्या काही काळाकरिताच ठरल्या. आश्रमाची प्रतिष्ठा आजही कायमच आहे.(वार्ताहर)


आश्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत
पाच वर्षांपूर्वी आश्रमातून महात्मा गांधी यांचा चष्मा चोरीला गेला. यामुळे संपूर्ण देशातच नाही देशाबाहेरही या घटनेचे पडसाद उमटले. आश्रम प्रतिष्ठानच्या व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. अखेर वर्धा पोलिसांनी या चष्मा चोराला अटक केली. मात्र त्याच्याकडून चष्मा जप्त करणे त्यांना शक्य झाले नाही. यामुळे आरोपी मिळाला पण चष्मा मिळाला नसल्याची खंत सर्वांनाच राहिली. या आश्रमात अशी कुठलीही दुसरी घटना घडू नये याकरिता आश्रम प्रतिष्ठाणच्यावतीने सतर्कता बाळगली जात आहे. यावर मार्ग काढण्याकरिता आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

वर्षभरात दीड लाख पर्यटकांच्या भेटी
आश्रमाला भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या वर्षाला आश्रमात १ लाख ३६ हजार १३ पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. यात शास्त्रज्ञ डॉ. पद्मनाभम, ना. दीपक केसलेकर यांच्यासह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेटी दिल्या. तर येथे नुकताच ग्रीनिज बुकात नाव असलेले गझल गायक डॉ. श्रीनिवास हैदराबादी यांनी भेट देत कार्यक्रमही सादर केला.
सेवाग्राम विकास आराखड्याची प्रतीक्षाच
महात्मा गांधीच्या विचाराची माहिती सर्वांना व्हावी, याकरिता राज्य शासनाच्यावतीने सेवाग्राम विकास आराखडा ‘गांधी फॉर टुमारो’ या संकल्पनेवर शासनाकडून विचार सुरू आहे. याकरिता मोठी रक्कम मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी यावर अद्याप कार्य सुरू झाले नसल्याने त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

Web Title: Seventh-year-old ashram, 80 years old, who gives message of peace and non-violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.