विचित्र अपघातात सात जण जखमी

By Admin | Updated: September 3, 2014 23:36 IST2014-09-03T23:36:05+5:302014-09-03T23:36:05+5:30

नागपूरहून वर्धेकडे येत असलेल्या तम्बीवार परिवाराच्या कारला भरधाव मालवाहू वाहनाने समोरून धडक दिली. यात कारमधील पाच जण जखमी झाले तर कारच्या मागे असलेल्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

Seven people injured in a strange accident | विचित्र अपघातात सात जण जखमी

विचित्र अपघातात सात जण जखमी

नालवाडीतील अपघात : मालवाहू चालक फरार
वर्धा : नागपूरहून वर्धेकडे येत असलेल्या तम्बीवार परिवाराच्या कारला भरधाव मालवाहू वाहनाने समोरून धडक दिली. यात कारमधील पाच जण जखमी झाले तर कारच्या मागे असलेल्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले. हा विचित्र अपघात बुधवारी दुपारी २.४५ च्या सुमारास नागपूर वर्धा मार्गावररील नालवाडी परिसरात घडला़
बुटीबोरी येथील प्रशांत तम्बीवार हे कार क्र. एम.एच. ३१ सीटी ३८८८ ने वर्धा येथे परिवारासह येत होते़ रामनगर येथील त्यांच्या नातलगांकडे महालक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार होते़ दरम्यान विरूद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ४०७ क्ऱ एम.एच. ११ जे. २४११ अनियंत्रित झाले़ प्रथम सदर वाहनाची एम़एच़ ४९ बी़ ७००८ या क्रमांकाच्या कारला धडक लागली; पण मागच्या बाजूला थोडीशी धडक लागल्याने हा अपघात बचावला़ यानंतर अनियंत्रित ४०७ ने तम्बीवार यांच्या कारला धडक दिली़ यावेळी कारच्या मागे असलेल्या दुचाकी चालकाने कार थांबल्याने ब्रेक लावले़ यात दुचाकीवरील दोघे जण खाली पडून जखमी झाले. अशोक आदमने (५४) व अमर आदमने (२४) अशी त्यांची नावे असून ते देवळी येथील नातलगांकडे महालक्ष्मीच्या जेवणाकरिताच जात होते़ दरम्यान तम्बीवार यांची कार वाहनाच्या धडकेमुळे रस्त्याच्या खाली उतरली़ या अपघातात कारमधील प्रीती तम्ब्ीवार, प्रशांत तम्बीवार, पुरूषोत्तम तम्बीवार, सिंधू तम्बीवार व गौरी तम्बीवार हे पाच जण जखमी झाले़
या प्रकरणी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून मालवाहु ४०७ च्या चालकाविरूद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदर मालवाहुचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अपघातस्थळावरील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ सदर वाहनाचा तपास शहर पोलीस घेत आहेत़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Seven people injured in a strange accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.