बसची ट्रकला धडक सात प्रवासी जखमी

By Admin | Updated: August 20, 2014 23:41 IST2014-08-20T23:41:45+5:302014-08-20T23:41:45+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका फाट्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसने ट्रकला मागाहून धडक दिली़ यात बस चालकासह सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी

Seven passengers of the bus were injured | बसची ट्रकला धडक सात प्रवासी जखमी

बसची ट्रकला धडक सात प्रवासी जखमी

बसचे नुकसान : खडका फाट्याजवळील घटना
तळेगाव (श्या़पं़) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका फाट्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसने ट्रकला मागाहून धडक दिली़ यात बस चालकासह सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला़
पवनी आगाराची बस एम. एच. ४० एऩ ८५२४ ही अमरावतीकडून प्रवासी घेऊन तर ट्रकही नागपूरकडे जात होता. दरम्यान, बसच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने बस समोरील ट्रकवर आदळली़ यात बसचालक महेंद्र गोविंद लंबोधरी (२४) रा. पवनी, दीक्षा गौतम इंगोले (५०) रा. अमरावती, समीर पुंडलिक डहाके (३२) रा. अमरावती, शामली राजेंद्र सराफ (२२) रा. वाशिम, दीक्षा बाबाराव कुचेकर (२३), ज्ञानोबा पुंड (३०), अब्दुल जलील (४०) रा. काटोल हे प्रवासी जखमी झाले़ सदर बसमध्ये २७ प्रवासी प्रवास करीत होते.
बसची ट्रकला धडक बसताच ट्रक चालकाने ट्रकसह घटना स्थळावरून पोबारा केला. सदर अपघात ट्रकला ओव्हरटेक करताना झाला़ जखमींना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ घटनास्थळाला विभाग नियंत्रक वर्धा, आगार प्रमुख पंकज दांडगे, अरुण डाखोळे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख, एएसआय अनिल मसराम, नितीन ताराचंदी, आतिष देवगीरकर करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: Seven passengers of the bus were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.