शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

कारसह सात दुचाकी, चार सायकलींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:31 IST

मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून उभ्या कारला धडक दिली. ट्रॅव्हल्सचालक इतक्यावर थांबला नाही तर त्याने वाहनाची गती वाढवित याच भागात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा केला.

ठळक मुद्देमद्यधुंद ट्रॅव्हल्सचालकाचा प्रताप : विद्युत खांबाचे नुकसान, वर्धा रेल्वेस्थानक मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून उभ्या कारला धडक दिली. ट्रॅव्हल्सचालक इतक्यावर थांबला नाही तर त्याने वाहनाची गती वाढवित याच भागात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा केला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वेस्थानक मार्गावरील महावीर भोजनालयासमोर घडली. सदर अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर वेळीच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक शास्त्री चौक येथून बजाज चौकाच्या दिशेने एम.एच. ३१ सी. क्यू. ५२०५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स जात होती. याच भरधाव ट्रॅव्हल्सने सुरूवातीला एम.एच.३२ सी. ४१३१ क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर ट्रॅव्हल्सचालकाने सदर वाहनासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी सदर ट्रॅव्हल्सचालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाची गती वाढवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम. एच. ३१ डी.पी. ११४९, एम. एच. ३२ डब्ल्यू. १३४८, एम. एच. ३२ ए.ई. ८००६, एम. एच. ३२ व्ही. ०८४३, एम. एच. ३२ एच. १५७०, एम. एच. ३२ एच. ५०७०, एम. एच. ३२ ए.सी. ४५५० या दुचाकींसह चार सायकलींचा चुराडा करून महावीर भोजनालयाच्या पुढे असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली. या विचित्र अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्ससह कार, दुचाकी व सायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात होताच संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आरोपी ट्रॅव्हल्सचालकाला चांगलाच चोप दिला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीद, सुभाष गावडे, वाघमारे, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे भोसले, जाधव, फुलभोगे, भगत, भोयर, सुरकार तसेच मार्शल पथकाचे शेंडे, दाते, मस्के, लंगडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे.बंदी असताना रेल्वेस्थानक मार्गावर ट्रॅव्हल्स आली कशी?लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्सला वर्धा शहरात दाखल होण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय नागपूर-वर्धा-यवतमाळ असा कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या काही ट्रॅव्हल्सला तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मौखिक सूचनांवरून सिव्हिल लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ केवळ थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून नेहमीच वर्दळीचा रस्ता असलेल्या वर्धा रेल्वेस्थानक मार्गावर सध्या काही ट्रॅव्हल्समालकांकडून रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत. रेल्वेस्थानक मार्गावर अशाच नेहमी उभ्या राहणाºया ट्रॅव्हल्सपैकी एक आजची अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स होती, हे विशेष.संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैदसदर विचित्र अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे ही अपघाताची संपूर्ण घटना याच मार्गावरीलच एका व्यावसायिक प्रतिष्ठानासमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.विद्युत खांब तुटलामद्यधुंद ट्रॅव्हल्सचालकाने उभ्या कारला धडक देत सात दुचाकी व चार सायकलींचा चुराडा करून रेल्वेस्थानक मार्गावरील महावीर भोजनालयाच्या पुढे असलेल्या सिमेंटच्या विद्युत खांबाला धडक दिली. यात विद्युत खांब आणि तेथील सुरक्षा पेटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पोलिसांची उडाली तारांबळमंगळवारी पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी होणार असल्याने मागील काही दिवसांपासून वर्धा शहर पोलीस ठाण्यातील विविध कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात होती. मंगळवारी इंस्पेक्शनच्या तयारीत असताना ही घटना घडल्याने पोलिसांची तारांबळच उडाली होती.बजाज चौकात सकाळीच केल्या तात्पुरत्या उपाययोजनावर्धा शहरातील बजाज चौकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी प्रत्यक्ष हजर राहून सहकाºयांच्या मदतीने तेथे बॅरिगेट्स लावून सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या उपाययोजना केल्या होत्या.पेट्रोलपंप की ट्रॅव्हल्स स्टॅण्ड?शास्त्री चौक ते बजाज चौक या मार्गावर मनमर्जीने ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहे. शास्त्री चौकातील पेट्रोलपंपावर सदर तेथील मालकाच्या व कर्मचाºयांच्या आशीर्वादानेच सध्या या ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे शास्त्री चौकातील पेट्रोलपंपाला ट्रॅव्हल्स स्टॅण्डचे स्वरूप येत असून कारवाईची जबाबदारी असलेल्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे जिल्ह्याधिकाºयांसह पोलीस अधीक्षकांनी लक्ष देत तत्काळ योग्य कारवाई करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघात