सात सायकलवीरांचा गौरव; बाजार परिसरात जनजागृती
By Admin | Updated: February 5, 2016 01:44 IST2016-02-05T01:44:27+5:302016-02-05T01:44:27+5:30
‘नो व्हेईकल डे’साठी वैद्यकीय जनजागृती मंचाकडून गुरूवारी शहरातील बाजार परिसरात एक दिवस वाहन न वापरण्याबाबत जागर करण्यात आला.

सात सायकलवीरांचा गौरव; बाजार परिसरात जनजागृती
वर्धा : ‘नो व्हेईकल डे’साठी वैद्यकीय जनजागृती मंचाकडून गुरूवारी शहरातील बाजार परिसरात एक दिवस वाहन न वापरण्याबाबत जागर करण्यात आला. यावेळी लॉयन्य क्लबच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमात नागपूर ते भंडारा ते साकोली व परत नागपूर असा २०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या सात वीरांचा सत्कार करण्यात आला. यात अंकित जैस्वाल, राजू दुरूतकर, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. नितीन मेशकर, डॉ. वैभव पाटणी, डॉ. अभिजीत खनके व डॉ. नितीन भलमे यांचा समावेश आहे. शिवाय आयुष्यभर सायकलनेच फिरणारे व एकही आजार नसलेले ७२ वर्षीय विश्वेश्वर आनपान यांचाही ‘रॅली आयडॉल’ म्हणून सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय जनजागृती मंचाने शहरातील बाजार परिसरात नो व्हेईकल डे बाबत जनजागृती केली. यावेळी बसस्थानक व झेंडा चौक येथे लॉयन्स क्लबच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.
जनजागृती रॅली व कार्यक्रमाला वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. आलोक विश्वास, डॉ. राजेश सरोदे, पवन बोधनकर, सुभाष पाटनकर, नीरज शुक्ला, मोहन मिसाळ, सोनाली श्रावणे, स्मीता बढिये, योगीता मानकर, विशाल नेहारे, लॉयन्सचे अध्यक्ष अभिषेक बेद, अभिजीत श्रावणे, वरुण फत्तेपुरिया, जयेज चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)