शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

सेवाग्राम विकास आराखडा सर्वसमावेशक

By admin | Updated: January 28, 2015 23:38 IST

नियोजित सेवाग्राम विकास आराखडा हा शाश्वत विकासासाठी पूरक आहे. हा आराखडा सर्वसमावेशक असून वर्ध्याला विकसित बनविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील

वर्धा : नियोजित सेवाग्राम विकास आराखडा हा शाश्वत विकासासाठी पूरक आहे. हा आराखडा सर्वसमावेशक असून वर्ध्याला विकसित बनविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील सिस्टर सिटी आंतरराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष बिल बोरम यांनी केले़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवाग्राम विकास आराखडाचे पॉवर पाँईट प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. वॉशिंगटन येथून आलेल्या बोरम यांच्यासमोर सेवाग्राम विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, नाबार्डच्या डॉ. स्रेहल बन्सोड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अनंत मिसे, आयटी पार्कचे संचालक विपीन भाटिया, व्यवस्थापक अब्दुल जुबेर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, नागपूर फर्स्ट प्रकल्पाचे शैलेश देशपांडे, समाजसेवक श्रीकांत बारहाते, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे आदी उपस्थित होते.वर्ध्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व सांगतानाच सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश करण्यात आलेल्या विविध बाबींचा तपशीलवार परिचय जिल्हाधिकारी सोना यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये करून दिला. जिल्ह्याची प्रशासकीय माहितीही करून दिली. वर्ध्याच्या विकासात भर घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध आवश्यक बाबींच्या नियोजित आराखड्यातील पैलूंची माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास आणि उपाय, शहरी विकास, ऐतिहासिक ठेवा, संस्कृती आदींबाबतही माहिती देण्यात आली़ बोरम यांच्याशी बारहाते यांनीही नियोजित विकास आराखडा आणि गांधी सिटी आराखड्यात आवश्यक असणारे महत्त्वाचे पैलू याबाबत सविस्तरपणे चर्चा केली. डॉ. करुणा करण, उत्तम गॅल्वाचे सुनील कत्याल आदींनीही चर्चेत सहभाग घेत मत प्रदर्शित केले़(कार्यालय प्रतिनिधी)